कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्यांनी मुलं घडवली त्यांचा माझ्या हातून सत्कार होतोय हे माझं भाग्य: संजू परब

04:40 PM Apr 27, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कुडासे येथील विद्यालयात गुरुवर्य सन्मान सोहळा संपन्न

Advertisement

दोडामार्ग :

Advertisement

ज्या शाळेत आपण शिकलो ती शाळा सुस्थितीत ठेवणे हे माजी विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी पार पाडले. ज्यांनी मुलं घडवण्याचे काम केलं अशा व्यक्तींचा सत्कार माझ्या हातून होतोय हे माझं भाग्य आहे. ज्यांनी शाळा उभारली अशा महात्म्यांना माझे अभिवादन. आजी माजी विद्यार्थ्यांनी शाळेवर असच प्रेम ठेवा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले.कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सतर्फे आयोजित गुरुवर्य सन्मान सोहळ्यात श्री. परब बोलत होते.दरम्यान, श्री. परब यांनी गावातील युवकांनी आयोजित नाट्य प्रयोगाला १५ हजार रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांमार्फत श्री. परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भेडशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक सर, उद्धव ठाकरे गटाचे बाबुराव धुरी, भागवत सर, मोहन पांगम सर, बोंद्रे सर, बाबाजी उर्फ दादा देसाई, रामदास मेस्त्री, पूजा देसाई, डॉ. प्रवीण देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चांगले कार्य करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.श्री. परब म्हणाले, संस्थेचे माजी अध्यक्ष आबासाहेब तोरसकर यांच्याशी माझे चांगले संबंध होते. जे पोटात तेच ओठात असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ज्या ज्ञात अज्ञात महात्म्यांनी शाळा उभारली त्यांना माझं अभिवादन. माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या शाळेला विसरत नाही.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article