For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माड्याच्यावाडीत भक्तीमय वातावरणा साजरा होणार गुरूपौर्णीमा उत्सव

माड्याच्यावाडीत भक्तीमय वातावरणा साजरा होणार गुरूपौर्णीमा उत्सव
Advertisement

बांदा / प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी (खालचीवाडी) येथील श्री स्वामी समर्थ मठात दरवर्षीप्रमाणे बुधवार, दि. २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. उत्सवानिमित्त पहाटे ५.०० वा. संकल्प, ६.०० वा. गुरुमंत्र, ८.०० वा. स्वामींच्या मठात धार्मिक विधी, ९.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व आरती, ११.०० वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांची पाद्यपूजा, ११.३० वा. दहावी, बारावी व योग विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, १२.०० वा. सद्गुरूंचे प्रबोधन व मार्गदर्शन, १.०० वा. सद्गुरू दर्शन सोहळा व अखंड महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
त्यानंतर दुपारी २.३० वा. स्वरसाई आरती मंडळ, म्हापसा (गोवा) यांच्यातर्फे घुमट आरतीचा कार्यक्रम, सायंकाळी ४.०० वा. गोपाळकृष्ण रवळनाथ आरती मंडळ, एकोशी यांच्यातर्फे घाट आरतीचा कार्यक्रम, सायंकाळी ७.०० वा. स्वामींची नित्य आरती आणि सायंकाळी ७.३० वा. मोरेश्वर महिला फुगडी मंडळ, नेरूर-वाघचौडी यांच्यातर्फे पारंपरिक फुगडीचा कार्यक्रम होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ व सद्गुरू माऊलींचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन श्री सद्गुरू भक्त सेवा न्यासचे अध्यक्ष श्री एकनाथ गावडे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.