For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राणे महाराज मठात गुरुपौर्णिमा उत्सव

राणे महाराज मठात गुरुपौर्णिमा उत्सव
Advertisement

कट्टा / वार्ताहर : मालवण तालुक्यातील वराड कुसरवेवाडी येथील परमपूज्य श्री राणे महाराज यांच्या मठात उद्या बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मठात संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 9 वा. परमपूज्य राणे महाराज पादुका पूजन व अभिषेक, तसेच परमपूज्य सुवर्ण महाराज व परमपूज्य मौनी महाराज यांच्या समाधी स्थळावर अभिषेक व पादुका पूजन.
10 वा. बुवा ह. भ. प. स्नेहलदीप सामंत यांचे सुश्राव्य कीर्तन, दु. 1 वा. महाआरती, 1.30 वा. महाप्रसाद, दु. 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत नामस्मरण व भक्त मंडळींचे भजन, रात्री 8 वा. बुवा अजित गोसावी यांचे सुश्राव्य भजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भक्त मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून गुरुकृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य राणे महाराज सेवा ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.