For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी

06:42 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी
Advertisement

सह्याद्रीनगर येथील आधार शिक्षण

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंचा सन्मान राखून व्यवसाय क्षेत्रात सेवाभाव जोपासावा, असे मार्गदर्शन ज्येष्ठ डॉ. गिरीधर पाटील यांनी केले. सह्याद्रीनगर येथील आधार शिक्षण संस्था संचालित श्री शिवबसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि बामणे इन्स्टिट्यूटऑफ फार्मसीतर्फे गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बिम्समधील निवृत्त ज्येष्ठ डॉ. गिरीधर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

कार्यक्रमाची सुरुवात महर्षि वेदव्यास यांची प्रतिमा तसेच होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉ. पूजा बामणे, कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. एम. एस. सानिकोप, बामणे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. चंद्रशेखर उपस्थित होते. यावेळी डॉ. गिरीधर पाटील यांचा प्रदीर्घ वैद्यकीय सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कॉलेजमधील ज्येष्ठ प्राध्यापकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

डॉ. सविता मठद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. मनीषा बेळवी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अस्मिता पाटील यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी प्रतिनिधी कामरान आणि चैत्रा नायक यांनी गुरुपौर्णिमेवर विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. मानसी चिंचणीकर यांनी केले. डॉ. सीमा बजंत्री यांनी आभार मानले.

श्री मरगाई योग मंदिर, भांदूर गल्ली 

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मरगाई मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक महादेव चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. महादेव चौगुले व योग शिक्षक विजय घाटगे यांच्या हस्ते पतंजली प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षीय भाषणात महादेव चौगुले यांनी सर्व योग साधकांना मार्गदर्शन केले. तसेच योग साधिका नंदा गंगण्णावर, रुपाली पाटुकले, प्रिती नाईक व रेखा मुतकेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुसंख्य योग साधक उपस्थित होते.

घुमटमाळ मारुती मंदिर : एक्सलंट योगा क्लासेस 

बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेसतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहाने साजरी करण्यात आली. योग गुरू एस. बी. कुलकर्णी यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारी अनंद लाड, संगीता बागी व शिवशंकरी नायक यांची भाषणे झाली. यावेळी गोपाळराव बिरजे, बी. के. बिरजे, प्रवीण पटेल, शिवाजी मुचंडी, छगन पटेल यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. मिठाई वाटून गुरुपौर्णिमेचा आनंद साजरा करण्यात आला. योग गुरू एस. बी. कुलकर्णी यांचेही भाषण झाले.

दैवज्ञ गणेशोत्सव-दैवज्ञ संघ : कालिका मंदिर 

बेळगाव : दैवज्ञ गणेशोत्सव-दैवज्ञ संघातर्फे बुधवारी कालिका मंदिर येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सच्चिदानंद स्वामी यांच्या प्रतिमेचे पाद्यपूजन गजानन राजापूरकर व अरुण दैवज्ञ यांच्या हस्ते करण्यात आले. कालिका देवीची पूजा व आरती प्रवीण अर्कसाली यांनी केली. याप्रसंगी अध्यक्ष उमेश बांदिवडेकर, राजेश कारेकर, हेमंत मुतकेकर, विशाल शिरोडकर, देवीदास काकतीकर, दीपक अडकूरकर, नितीन नंद्याळकर, विनायक कणबरकर, दीपक कलघटगी, राजू बेकवाडकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. पौरोहित्य सोमण भटजी यांनी केले.

Advertisement
Tags :

.