For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदावर्ते हा शॉर्ट टेम्पर्ड माणूस! पैसे घेऊन नोकरभरती केली; कामगार संघटनेचा आरोप

03:20 PM Dec 08, 2023 IST | Abhijeet Khandekar
सदावर्ते हा शॉर्ट टेम्पर्ड माणूस  पैसे घेऊन नोकरभरती केली  कामगार संघटनेचा आरोप
Gunratna Sadavarte
Advertisement

गुणरत्न सदावर्ते यांना बँकेचे मार्गदर्शक म्हणून आम्ही स्वीकारले होते मात्र ते आता मालक व्हायला चालले आहेत. याला आता एसटी जनसंघाने विरोध दर्शविला असून बँकेचे 19 पैकी 11 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात एकवटले असल्याची माहिती एसटी कामगार नेते संतोष शिंदे यांनी दिलीये. ते आज कोल्हापूरात बोलत होते.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून एस.टी. कर्मचारी बँकेतील मनमानी कारभारावर बँकेच्या संचालकमंडळातील काही सदस्यांनी नाराजी व्यक्त करून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप केले आहेत. बंडखोर संचालकांच्या म्हणण्यानुसार गुणरत्न सदावर्ते यांनी आपला मेव्हणा सौरभ पाटील याचे लाड पुरवण्यासाठी बँकेवर त्याची नेमणूक केली असल्याचा आरोप केला आहे.

आज कोल्हापूरात एसटी कामगार संगटनेचे नेते संतोष शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभिर आरोप केले. ते म्हणाले, "गुणरत्न सदावर्ते यांना बँकेचे मार्गदर्शक म्हणून आम्ही स्वीकारले होते मात्र ते आता मालक व्हायला चालले आहेत. याला आता एसटी जनसंघाने विरोध दर्शविला असून बँकेचे 19 पैकी 11 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात एकवटले आहेत. तसेच गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील आणि त्यांचे म्हेवणे सौरभ पाटील यांच्या वादग्रस्त कारभारावर बोट ठेवत त्यांची लवकरच हाकालपट्टी करणार आहे." असेही ते म्हणाले.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले, "सदावर्ते यांनी पैसे घेऊन आणि बेकायदेशीर रित्या नोकरभरती केली असून जयश्री पाटील या मनमानी कारभार करत आहेत. तर त्यांचे म्हेवणे सौरभ पाटील यांची सुद्धा बँकिंग क्षेत्रात कोणतेही ज्ञान नसताना त्यांची नियुक्ती बँकेच्या उच्च अधिकारीपदी नियुक्ती करून एक नवा वाद निर्माण केला आहे. याचीही चौकशी होईल असे सांगत आम्ही इतर सर्वजण जनसंघ म्हणून आता एकत्रच राहणार." असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.