कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘गुंगा पैलवान’ही पद्मश्री परत करणार

06:39 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

साक्षी-पुनियाच्या समर्थनार्थ विरेंद्र सिंह यादवचे कठोर पाऊल

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

‘डब्ल्यूएफआय’मध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या विजयानंतर निषेधाचे सत्र सुरूच आहे. महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने शुक्रवारी पदक परत करण्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता आणखी काही खेळाडू पुरस्कार वापसीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. ‘गुंगा पैलवान’ अशी ओळख असणारे  डेफलिम्पिक सुवर्णपदक विजेता विरेंद्र सिंह यादव यांनी आता देशातील अव्वल कुस्तीपटूंशी एकजूट दाखवत सरकारला पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांच्या डब्ल्यूएफआय अध्यक्षपदी निवड करण्यावर विरेंद्र सिंह यादव यांनी आक्षेप घेतला आहे. ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तीयाच्या निवडीच्या निषेधार्थ विरेंद्र यांनी पद्मश्री सन्मान परत करणार असल्याचे सांगितले. त्यांना 2021 मध्ये देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री मिळाला होता. त्यापूर्वी 2015 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे व्यावसायिक भागीदार आणि सहकारी मानले जाणारे संजय सिंह यांनी फेडरेशनचे सर्वोच्च पद स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक भारतीय खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केल्यानंतर आता कुस्तीपटू वीरेंद्र सिंह यादवनेही कठोर पाऊल उचलले आहे. तसेच दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहित पुरस्कार परत केला आहे.

साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि इतर खेळाडूंनी फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यापासून डब्ल्यूएफआय अध्यक्षपदावरून बरेच वादविवाद सुरू आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article