दोडामार्ग तालुका काँग्रेस अध्यक्षपदी गुणाजी गवस
दोडामार्ग – वार्ताहर
उसप येथील गुणाजी केशव गवस यांची दोडामार्ग तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांना या निवडीचे पत्र देखील त्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी दिले आहे.राष्ट्रीय काँग्रेसचे राज्याचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही निवड जाहीर करण्यात आली. गुणाजी गवस यांनी काँग्रेस पक्षात सहकार सेल वर प्रदेश कार्यकारणी सरचिटणीस म्हणून देखील काम केले आहे. त्याशिवाय गेल्या २५ वर्षांपासून आपण काँग्रेसचे काम करत आहे असेही ते म्हणाले. येणाऱ्या काळात तालुक्यात जि. प. व पं. स. निवडणुकीत जोमाने काम करून काँग्रेसला गतवैभव मिळवून देणार आहे. तसेच पक्ष बळकट करण्यासाठी आपण जोमाने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तालुक्यातील हत्ती प्रश्न, रोजगार, आरोग्य यांवर लक्ष केंद्रित करून जनतेला काँग्रेसच्या माध्यमातून न्याय देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे गवस म्हणाले.