For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या राष्ट्रीय विक्रमासह गुलवीर सिंगला रौप्य

06:22 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
नव्या राष्ट्रीय विक्रमासह गुलवीर सिंगला रौप्य
Advertisement

वृत्तसंस्था/ लॉस एंजेलिस

Advertisement

अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या महितीनुसार, भारतीय लांब पल्ल्याच्या धावपटू गुलवीर सिंग याने अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित साउंड रनिंग टॅक फेस्टमध्ये पुरुषांच्या 5000 मीटर मैदानी शर्यतीत 13:03:93 अशी वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आणि रौप्यपदक पटकावले.

गुलवीरने 13:03:93 अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले, तो न्यू मेक्सिकोच्या हॅबटॉम सॅम्युअलच्या (ज्याने 12:57:22 अशी वेळ नोंदवत विजय मिळवला) मागे रहिला. ऑस्ट्रेलियाचा जॅक्सन शार्प 13:03:22 या वेळेसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे ,गुलवीरची 12:59:77 ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी अजूनही अबाधित आहे, ही कामगिरी त्याने अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी टेरियर चॅलेंज 2025 या इनडोअर स्पर्धेत साध्य केली होती.

Advertisement

दरम्यान, त्याची 13:03:93 ही वेळ मैदानी शर्यतीमधील राष्ट्रीय विक्रम ठरली आहे. विशेष बाब म्हणजे, गुलवीरने आपल्याच राष्ट्रीय विक्रमात जवळपास आठ सेकंदांची सुधारणा केली आहे, यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये जपानमध्ये त्याने 13:11.82 से. असा विक्रम नोंदवला होता.

या वर्षाच्या सुरुवातीला 27 वर्षीय गुलवीरने न्यूयॉर्क सिटी हाफ मॅरेथॉन 2026 मध्ये 59:42 अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले होते. या कामगिरीसह एक तासापेक्षा कमी वेळेत हाफ मॅरेथॉन  पूर्ण करणारा तो पहिला भातरीय धावपटू ठरला. यापूर्वीचा 1:00:30 हा राष्ट्रीय विक्रम स्टीपलचेस शर्यतीतील तज्ञ अविनाश साबळे याने 2020 मध्ये दिल्ली हाफ मॅरेथॉन दरम्यान प्रस्थापित केला होता. 3000 मीटर ट्रॅक शर्यतीपासून ते 25 किलोमीटरच्या रस्ते शर्यतीपर्यंत विविध प्रकारांमध्ये एकाधिक राष्ट्रीय विक्रम नावावर असलेला गुलवीर हा पहिलाच भारतीय लांब पल्लाचा धावपटू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता असलेल्या गुलवीरच्या नावावर पुरूषांच्या 5000 मीटर आणि 10,000 मीटर ट्रॅक शर्यतीचे राष्ट्रीय विक्रमही जमा आहेत. 2025 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्येही गुलवीरची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. या स्पर्धेत त्यानं 5000 मीटर आणि 10,000 मीटर अशा दोन्ही टॅक शर्यतीमध्ये विजय मिळवला होता. या वर्षी जुलैमध्ये होणाऱ्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवून पोडियम फिनिश गाठण्याबाबत तो पूर्णपणे आत्मविश्वासी आहे.

Advertisement

.