महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरलीन सेठीसोबत दिसणार गुलशन देवैया

06:29 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डिस्ने प्लस हॉटस्टारची सीरिज

Advertisement

भारतीय प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय वेबसीरिज निर्माण करण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे. आता जर्मन टेलिव्हिजन सीरिज ‘बॅड कॉप : क्रिमिनल गट’चे हिदी रुपांतरण होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारकडून या सीरिजची निर्मिती करण्यात येणार आहे. मूळ सीरिजमध्ये डेव्हिट रॉटने मुख्य भूमिका साकारली होती. तर हिंदी सीरिजमध्ये गुलशन देवैया मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

Advertisement

या सीरिजचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांच्याकडून केले जाणार आहे. जर्मन सीरिजच्या हिंदी रिमेकसाठी रेंसिल डी सिल्वा आणि हुसैन दलाल यांच्याकडून कथा लिहिली जाणार आहे. या सीरिजमध्ये हरलीन सेठी, अनुराग कश्यप, सौरभ सचदेव आणि सुष्मिता ऐश्वर्या देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. ही सीरिज चालू वर्षाच्या उत्तरार्धात प्रदर्शित होणार आहे.

या सीरिजमध्ये मुंबईतील पार्श्वभूमी दाखविण्यात येणार आहे. एक यशस्वी पोलीस निरीक्षक आणि एक गुन्हेगार असलेल्या जुळ्या भावांवर आधारित याची कहाणी असेल. गुलद देवैया आगामी काळात ‘उलझ’ या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत दिसून येणार आहे. तर गन्स अँड गुलाब या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये तो मुख्य भूमिकेत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article