For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवाराने बरोबरीत रोखल्याने गुकेशचा विजयाचा शोध चालूच

06:05 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
नवाराने बरोबरीत रोखल्याने गुकेशचा विजयाचा शोध चालूच
Advertisement

वृत्तसंस्था/ प्राग

Advertisement

प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाच्या चौथ्या फेरीत झेक प्रजासत्ताकच्या डेव्हिड नवाराने बरोबरीत रोखल्याने जागतिक विजेता डी. गुकेशचा पहिला विजय मिळविण्याचा प्रयत्न सुरूच राहिला. या दिवशी हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टने चार सामन्यांमध्ये तिसरा विजय मिळवून इतरांवर आघाडी घेतली, तर गतविजेता अरविंद चिदंबरम जर्मनीच्या विन्सेंट कीमरविऊद्ध पराभूत झाला.

व्हॅन फॉरेस्टने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबबोएव्हचा पराभव केला. तर 10 खेळाडूंच्या राउंड-रॉबिन स्पर्धेतील इतर दोन सामने बरोबरीत संपले. अमेरिकन हान्स मोके निमनने इराणच्या परहम मगसुदलूशी बरोबरी साधली आणि डेव्हिड आंतोन गुइजारोने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक याकुबबोएव्हविऊद्ध तसाच निकाल मिळवला.

Advertisement

पाच फेऱ्या अजून बाकी असताना आणि अर्धा टप्पा ओलांडण्याची वेळ आली असताना व्हॅन फॉरेस्ट तीन गुणांसह आघाडीवर असून त्यानंतर अब्दुसत्तोरोव्ह आणि नवारा आहेत, जे याकुबबोएव्ह, कीमर आणि गुइजारो यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहेत. उर्वरित चार सहभागी चिदंबरम, गुकेश, निमन आणि मगसुदलू हे सर्व जण प्रत्येकी 1.5 गुणांसह सातव्या स्थानावर आहेत.

झेक प्रजासत्ताकच्या या अव्वल खेळाडूला गुकेशविऊद्ध कठीण परिस्थितीत स्वत:चे रक्षण करावे लागले, परंतु त्याने विश्वविजेत्याला कोणताही निर्णायक फायदा मिळवून दिला नाही. 72 चालींनंतर गुकेशला गुण विभागून घ्यावे लागले. दुसरीकडे, चिदंबरमने फिलिडोर डिफेन्सला चिकटून राहण्याचा निर्णय घेतल्याने कीमरला आश्चर्य वाटले. या जवळजवळ एकतर्फी सामन्यात भारतीय खेळाडूने आधी एक मोहरा गमावला आणि नंतर एका उंटाला गमावले.

दरम्यान, चॅलेंजर्स विभागात जागतिक महिला विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखने एकट्याने आघाडीवर असलेल्या झेक प्रजासत्ताकच्या व्हँक्लाव फिनेचशी बरोबरी साधली, तर दुसरा भारतीय खेळाडू सूर्यशेखर गांगुलीने यजमान देशाच्या स्टेपन हर्बेकविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविला. दिव्याचे स्पर्धेत 1.5 गुण झाले आहेत आणि गांगुलीचा एक गुण झालेला आहे. 3 गुणांनिशी फिनेच आघाडीवर आहे.

Advertisement
Tags :

.