For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वॉर्सात गुकेशची खराब सुरुवात अर्जुनने कार्लसनला रोखले

06:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
वॉर्सात गुकेशची खराब सुरुवात अर्जुनने कार्लसनला रोखले
Advertisement

वृत्तसंस्था /वॉर्सा

Advertisement

फिडे कँडिडेट्स स्पर्धेचा नवा विजेता डी. गुकेशची सुऊवात चांगली राहिलेली नसली, तरी भारताच्या अर्जुन एरिगाईसीने ग्रँड चेस टूरचा एक भाग असलेल्या सुपरबेट रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला सहज बरोबरीत रोखून दाखविले.  जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या अर्जुनने स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीनंतर सुऊवातीपासून आघाडीवर राहिलेल्या रोमानियाच्या किरिल शेवचेन्कोच्या जवळ पोहोचण्यात यश मिळविताना आणखी दोन सामने बरोबरीत सोडविले. दुसरीकडे, तिसरा सामना बरोबरीत सोडविण्यापूर्वी गुकेशने पहिले दोन सामने गमावले, तर आर. प्रज्ञानंदने तिसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव्हला पन्नास टक्के गुण मिळवून पराभूत केले. स्पर्धेतील सर्वांत कमी मानांकित शेवचेन्को हा तीन विजयांसह सुऊवातीलाच आघाडीवर गेला आहे. पहिल्या फेरीत गुकेशने केलेल्या दुर्मिळ घोडचुकीचा फायदा या युक्रेनियन-रोमानियन खेळाडूने घेतला. त्यानंतर त्याने प्रज्ञानंदचा शानदार खेळात पराभव केला आणि नंतर जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरच्या बचावाला भेदताना तांत्रिक कौशल्य दाखवले.

Advertisement
Advertisement
Tags :

.