For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेशचे अग्रस्थान कायम, कार्लसनवर मात

06:23 AM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
गुकेशचे अग्रस्थान कायम  कार्लसनवर मात
Advertisement

वृत्तसंस्था/ झाग्रेब (क्रोएशिया)

Advertisement

विश्वविजेता डी. गुकेशने येथे सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या सहा फेऱ्यांनंतर एकट्याने अग्रस्थान पटकावताना जगातील अव्वल क्रमांकधारक मॅग्नस कार्लसनवर आणखी एक प्रभावी विजय मिळवला. गुऊवारी उशिरा कार्लसनविऊद्ध मिळविलेला सदर विजय हा गुकेशचा स्पर्धेतील सलग पाचवा विजय होता आणि त्याने संभाव्य 12 पैकी 10 गुण मिळवले आहेत.

रॅपिड विभागात फक्त तीन फेऱ्या शिल्लक असताना गुकेशने जवळचा प्रतिस्पर्धी पोलंडचा डुडा जान-क्रिज्स्टोफवर दोन गुणांची आघाडी मिळविली आहे. अमेरिकेचा वेस्ली सो सात गुणांसह एकटाच तिसऱ्या स्थानावर असून कार्लसन, हॉलंडचा अनीश गिरी आणि स्थानिक इव्हान सारिच यांच्यापेक्षा पूर्ण गुणाने पुढे आहे. आर प्रज्ञानंद पाच गुणांसह अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनासह सातव्या स्थानावर आहे, तर फ्रान्सचा अलिरेझा फिरोजा चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

Advertisement

उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह फक्त तीन गुणांसह 10 व्या स्थानावर आहे. कार्लसन खेळाच्या वेगवान आवृत्तीच्या बाबतीत गुकेशचा टीकाकार राहिला आहे. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशकडून झालेल्या मागील पराभवानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या खेळाडूने कुप्रसिद्धपणे टेबलवर हात आपटला होता. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लसवर भारतीय खेळाडूने क्लासिकल बुद्धिबळात मिळविलेला तो पहिलाच विजय होता.

काळ्या रंगाच्या सोंगाट्यांनिशी खेळताना मिळालेला हा विजय गुकेशसाठी गोड होता. गुकेशने शांतपणे कार्लसनच्या वाईट योजनेचा फायदा घेतला आणि 49 चालींनंतरविजय मिळवला. सदर दिवशी त्याच्या आधी गुकेशने काही चांगल्या प्रयत्नांच्या जोरावर अब्दुसत्तोरोव्ह आणि काऊआनाला हरवले. प्रज्ञानंदचा विजयाचा शोध मात्र सुरूच राहिला. कारण त्याचे काऊआना, कार्लसन आणि गिरीसोबतचे तिन्ही सामने बरोबरीत सुटले. स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी प्रज्ञानंदला अंतिम दिवशी काही विजयांची आवश्यकता भासेल.

Advertisement
Tags :

.