For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातचा सामना आज राजस्थानशी

06:40 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुजरातचा सामना आज राजस्थानशी
Advertisement

वृत्तसंस्था/   अहमदाबाद :

Advertisement

कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असलेला वेगवान मारा निश्चितच धोकादायक वाटतो, पण आज शनिवारी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल अशा मैदानावर ’वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशी जेव्हा त्यांचा सामना करेल, तेव्हा या त्रिकुटासमोर मोठे आव्हान असेल. गुजरात टायटन्सविऊद्धच्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे पारडे भारी मानले जात आहे.

’वैभव कांड’च्या दुसऱ्या पर्वाची सुऊवात या 15 वर्षीय खेळाडूने चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीवर 15 चेंडूंत 50 धावा करून केली आहे, पण तो सामना 127 धावांचा पाठलाग करण्याचा आणि एका कमकुवत दर्जाच्या गोलंदाजीविऊद्ध होता. शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सूर्यवंशी पुन्हा एकदा जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, पण तिथे रबाडा, सिराज आणि प्रसिद्ध यांच्या रूपाने तीन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोलंदाज असतील, जे त्याची कसोटी पाहण्यास उत्सुक असतील.

Advertisement

टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल मुल्लानपूरमधील सलामीच्या सामन्यापेक्षा काही अधिक विवेकपूर्ण निर्णय आज घेईल अशी अपेक्षा आहे. तिथे सिराजला केवळ दोन षटके देण्यात आली होती आणि प्रसिद्धला तब्बल 13 व्या षटकात गोलंदाजीसाठी आणण्यात आले होते. गुजरात संघाची समस्या म्हणजे त्यांचे पहिले तीन फलंदाज 200 पेक्षा जास्त स्ट्राइक-रेटने धावा करत नाहीत. कर्णधार गिल आणि बटलर हे दोघेही मुल्लानपूर येथे पंजाब किंग्सविऊद्ध लयीत दिसले नाहीत. सुदर्शन देखील दुखापतीतून परतल्यानंतर लयीत येण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय शाहऊख खान, वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांचा समावेश असलेली त्यांची मधली फळी सर्वोच्च दर्जाचा विश्वास निर्माण करत नाही.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.