For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातचा मुकाबला आज फॉर्मात असलेल्या ‘केकेआर’शी

06:51 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरातचा मुकाबला आज फॉर्मात असलेल्या ‘केकेआर’शी
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

शुभमन गिल पुन्हा फॉर्मात आल्याने गुजरात टायटन्सला आज सोमवारी येथे गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करताना मोठे बळ मिळेल. गिलने आपल्या चौथ्या आयपीएल शतकासह पुनरागमन केले आणि मागील सामन्यात घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जविऊद्ध आरामात विजय मिळवून गुजरातच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याची धूसर आशा जिवंत ठेवली.

मागील सामन्यात गिल आणि साई सुदर्शन यांची शतके ही यजमानांच्या धावसंख्येचा आधारस्तंभ राहिली आणि त्यांची भूमिका आज पुन्हा एकदा महत्त्वाची ठरेल. कारण त्यांचा सामना केकेआरशी आहे, जो प्लेऑफसाठी पात्र ठरलेला पहिला संघ ठरला आहे. अद्यापही तब्बल सात संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांचे प्रत्येकी 10 गुण झालेले आहेत आणि ते कमाल 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. उणे धावसरासरीमुळे गुजरातला संधी सर्वांत कमी आहे आणि या माजी विजेत्यांना पहिल्या चार संघांमध्ये प्रवेश करण्यासाठी एखादा चमत्कारच लागेल.

Advertisement

गुजरातला आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी मोठे विजय नोंदवावे लागतील. या हंगामात वेगवान गोलंदाज सातत्यपूर्ण राहिले नसल्याने आणि फिरकी गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्याने गुजरातच्या माऱ्याला धार राहिलेली नाही. पण सीएसकेविरुद्ध मोहित शर्मा आणि रशिद खाने प्रभाव पाडलेला आहे. पण पुन्हा एकदा लक्ष त्यांच्या वरच्या फळीतील फलंदाजांवर राहील. गिल आणि सुदर्शन यांनी सलामीची विक्रमी भागीदारी करण्याच्या आधी काही सामन्यांमध्ये ही फळी अपयशी ठरली.

दुसरीकडे, केकेआर काल रात्री पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी विजय मिळवून प्लेऑफसाठी पात्र ठरल्यानंतर आता अव्वल दोन संघांमध्ये स्थान कायम राखण्यासाठी त्यांना उर्वरित दोन सामन्यांमध्ये फक्त एक विजय आवश्यक आहे. सुनील नरेनने आपल्या अष्टपैलू खेळाने संघाला पुढे नेले असून वेस्ट इंडिजचा सहकारी आंद्रे रसेल देखील या मोसमात 222 धावा आणि 15 बळींसह प्रभावी ठरलेला आहे. लेगस्पिनर वऊण चक्रवर्ती 18 बळी घेऊन चांगल्या लयीत आहे. फिल सॉल्टनेही संघाला सनसनाटी सुऊवात करून दिलेली आहे, परंतु गेल्या तीन डावांत तो थोडासा कमी पडला आहे. केकेआर या मोसमात सर्वांत सातत्यपूर्ण संघ म्हणून उदयास आलेला आहे. परंतु गेल्या तीन लढतींमध्ये गुजरातने त्यांना दोनदा पराभूत केलेले आहे.

संघ:  कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरो, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रहमान, गस अॅटकिन्सन, ए. गझनफर आणि फिल सॉल्ट.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला उमरझाई, उमेश यादव, शाहऊख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर आणि बी. आर. शरथ.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.