For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरात, राजस्थान : हॅटट्रिक साधणार?

06:22 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरात  राजस्थान   हॅटट्रिक साधणार
Advertisement

गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत याच विजयाची पुनरावृत्ती दोन्ही राज्यांमध्ये होईल का, हा विश्लेषकांच्या चर्चेचा विषय आहे. या दोन राज्यांमध्ये मिळून 51 जागा आहेत. राजस्थानातील 25 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया प्रथम आणि द्वितीय टप्प्यांमध्ये पूर्ण झाली आहे. तर गुजरातमध्ये ती 7 मे या दिवशी, अर्थात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात पूर्ण होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या हॅटट्रिकची शक्यता या दोन राज्यांमध्ये किती आहे, याचा हा आढावा...

Advertisement

राजस्थानात हॅटट्रिक शक्य?

?गेल्या दोन निवडणुकांमध्ये सर्व 25 जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाला यंदा पुन्हा याच यशाची अपेक्षा आहे. पण ही अपेक्षा पूर्ण होईल का, याविषयी विश्लेषकांमध्ये मतमतांतरे दिसून येतात. कोणत्याही निवडणुकीची मतगणना होण्याआधी अशा तऱ्हेची उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होतच असते.

Advertisement

?यावेळी राजस्थानात हॅटट्रिक साधण्यात भारतीय जनता पक्षाला काही अडचणी येतील, असे काही विश्लेषकांचे मत आहे. राजस्थानात काही मतदारसंघांमध्ये स्थानिक मुद्दे उफाळून आले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेलाही मागे टाकतील, अशी काही विश्लेषकांची मांडणी आहे.

?तथापि, प्रत्येक निवडणुकीत असे काही ना काही मुद्दे असतातच. कोणतीही निवडणूक कोणत्याही पक्षासाठी अडचणीच्या मुद्द्यांशिवाय नसते. त्यामुळे केवळ या मुद्द्यांवरुन भारतीय जनता पक्ष हॅटट्रिक करु शकणार नाही, असे म्हणणे वस्तुस्थितीला धरुन नाही, असे म्हणणे अनेक विश्लेषकांनी मांडले आहे.

विवाद्य मुद्दे कोणते आहेत...

  1. जाट विरुद्ध रजपूत वाद

?या वादाचे कारण चुरु मतदारसंघातील संघर्ष हे आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने यंदा आपल्या विद्यमान खासदारांच्या स्थानी दिव्यांग ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते देवेंद्र झाझरिया यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सध्याचे या पक्षाचे खासदार राहुल कासवान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन तिकिट मिळविले. यातून जाट विरुद्ध रजपूत असा संघर्ष सुरु झाल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा भारतीय जनता पक्षाला निवडणूक सोपी नाही. कदाचित पारडे फिरु शकते, असे म्हटले जाते.

?तथापि, या दोन जातींमधला वाद नवा नाही. तो अनेक दशकांचा आहे. तरीही त्याचा निवडणुकीवर परिणाम होतोच असे नाही. देवेंद्र झाझरिया हे या भागात लोकप्रिय आहेत. त्यांना या वादाचा फटका बसणार नाही. कासवान यांनी पक्ष बदलून काँग्रेसची उमेदवारी मिळविली आहे. काँग्रेस पक्ष येथे फारसा लोकप्रिय नाही. शिवाय ही राष्ट्रीय निवडणूक असल्याने स्थानिक वादांपलिकडे जाऊन मतदार विचार करतात, असे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे स्थानिक वादाचा बाऊ मतदारांकडून केला जाणार नाही, असे मानणारे विश्लेषकही आहेत.

  1. राजकीय घराण्यांमधील वाद...

?झुनझुनू मतदारसंघात असा वाद प्रामुख्याने आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचे शीशराम ओला यांच्या घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. ते स्वत: येथून पाच वेळा विजयी झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रथम जिंकली. पण नंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवार नवा द्यावा लागला. यंदा काँग्रेसने येथे ओला यांचे पुत्र ब्रिजेंदसिंग, जे झुनझुनूचे आमदार आहेत, त्यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदारांच्या स्थानी माजी आमदार शुभकरण चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. चौधरी यांनी रजपूत समाजाविषयी वादग्रस्त टिप्पणी केल्याने भारतीय जनता पक्षाला ही जागा प्राप्त करण्यात अडचणी येऊ शकतात, असे काही पत्रकारांचे मानणे आहे.

?भारतीय जनता पक्षाने हे विश्लेषण फेटाळले आहे. निवडणुकीच्या प्रचारात काहीवेळा उमेदवारांकडून वादग्रस्त भाषा केली जाते. तथापि, तिचा व्यापक परिणाम होत नाही. भारतीय जनता पक्षाने राजस्थानात गेल्या अनेक दशकांपासून हिंदू धर्मातील विविध जात्याधारित समाजघटकांना एकत्र आणले आहे. हे एकसंधत्व एखाद्या विधानांमुळे मोडत नसते. मतदार अशा विधानांऐवजी व्यापक विचार करुनच मतदान करतात, असा अनुभव आहे. नुकतीच पक्षाने राजस्थान विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. सर्व हिंदू समाजघटकांनी पक्षाला मते दिल्यानेच हा विजय शक्य झाला. लोकसभा निवडणुकीतही हे सर्व समाजघटक किरकोळ मतभेद विसरुन आम्हालाच मतदान करतील असे पक्षाचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.