महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरात जायंट्सचा थरारक विजय

06:40 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नोएडा

Advertisement

2024 च्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात गुजरात जायंट्सने तेलुगू टायटन्सचा 31-28 अशा 3 गुणांच्या फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील गुजरात जायंट्सचा हा तिसरा विजय आहे.

Advertisement

गुजरात जायंट्स संघातील प्रतिक दाहियाने सुपर 10 गुण मिळविले. तर विजय मलिकने 15 गुण नोंदवित आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावला. पहिल्या 5 मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी बचावात्मक खेळावर अधिक भर दिला होता. प्रतिक दाहियाने 6 व्या मिनिटाला तसेच 8 व्या मिनिटाला आपल्या चढायांवर गुण वसूल केले. गुमान सिंगच्या चढाईवर 2 गुण गुजरातला मिळाले. यावेळी गुजरातने तेलुगू टायटन्सवर 3 गुणांची आघाडी घेतली होती. विजय मलिकने आपल्या एकहाती कामगिरीवर तेलुगू टायटन्सला गुण मिळवून दिले.

दरम्यान गुजरात जायंट्सच्या खेळाडुंनी आक्रमक खेळ न केल्याने दोन्ही संघांमध्ये आघाडीसाठी चुरस निर्माण झाली. विजय मलिकने मध्यंतरापर्यंत सुपर 10 गुण वसुल केल्याने तेलुगू टायटन्सला गुजरात जायंट्सशी बरोबरी साधता आली. आशिष नरवालने आपल्या चढाईवर 2 गुण वसुल केल्याने मध्यंतरावेळी गुजरात जायंट्सने तेलुगू टायटन्सवर 17-15 अशा 2 गुणांची आघाडी मिळवली. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर प्रतिक दाहियाने 2 गुण वसुल केले. तसेच त्याने तेलुगू टायटन्सचे सर्व गडी बाद केले. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना गुजरात जायंट्सने तेलुगू टायटन्सवर 2 गुणांची बढत मिळवली होती. प्रतिक दाहियाच्या आक्रमक चढायांवर गुजरात जायंट्सने तेलुगू टायटन्सवर केवळ एका गुणाची आघाडी मिळवली होती. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गुजरात जायंट्सने दर्जेदार खेळ करत तेलुगू टायटन्सचा 3 गुणांच्या फरकाने पराभव केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article