For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरात जायंट्सची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल प्रो कबड्डी लीग : बंगाल वॉरियर्सवर विजय

06:17 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरात जायंट्सची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल प्रो कबड्डी लीग   बंगाल वॉरियर्सवर विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

गुजरात जायंट्सने बंगाल वॉरियर्सवर 41-32 असा विजय मिळवित प्रो कबड्डी लीगच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली.

या विजयानंतर गुजरात संघ 19 सामन्यांतून 60 गुण मिळवित चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात सुरुवातीला मनिंदर सिंगने काही रेडपॉईंट्स मिळविल्याने पाचव्या मिनिटाला वॉरियर्सने 5-3 अशी आघाडी घेतली. फाझल अत्राचलीने अप्रतिक टॅकल करीत नवीन कुमारला बाद केले तरी वॉरियर्सने 6-4 अशी आघाडी कायम ठेवली. नंतर प्रतीक दाहियाने सुपर रेडवर अक्षय कुमार, वैभव गर्जे व जसकिरत सिंग यांना बाद करीत गुजरातला प्रथमच 8-6 अशी आघाडी मिळवून दिली. 12 व्या मिनिटाला गुजरातने बंगालला ऑलआऊट करीत 12-7 अशी भक्कम आघाडी घेतली.

Advertisement

नंतर जायंट्सने आणखी एकदा ऑलआऊट केले तर वॉरियर्सनेही गुजरातला ऑलआऊट करीत गुजरातची आघाडी कमी केली. पण राकेशने सुपर रेडवर तीन खेळाडूंना बाद करीत गुजरातचा विजय निश्चित केला.

Advertisement
Tags :

.