महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुजरात जायंट्सची यू मुम्बावर मात,

06:21 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

प्रो कबड्डी लीगमधील सामन्यात सोनू जगलान पुन्हा एकदा गुजरात जायंट्सचा हिरो ठरला असून त्याच्या शानदार खेळीमुळे गुजरातने यू मुम्बावर 39-37 असा केवळ दोन गुणांनी विजय मिळविला.

Advertisement

कर्णधार फाझल अत्राचलीचा हा कर्णधार म्हणून 100 वा सामना होता. त्यामुळे या सामन्यातील विजय जायंट्ससाठी संस्मरणीय ठरला. सामन्याच्या पहिल्या काही मिनिटांत दोन्ही संघांनी काही वेळ एकमेकांवर आघाडी मिळविली होती. गुमान सिंगने चढाईमध्ये दोन गुण घेतल्यानंतर पाचव्या मिनिटाला यू मुम्बाला 7-5 अशी आघाडी मिळाली. जायंट्सने नंतर ट्रम्प कार्ड सोनू जगलानचा सातव्या मिनिटाला उतरवला. पण सुरुवातीला त्याला अपेक्षित सूर गवसला नाही. राकेश एचएस जायंट्सच्या मदतीला धावून आला. त्याने एक बोनस गुण मिळविला आणि रिंकू सिंगला स्पर्श करून आल्यानंतर त्यांना 10-9 अशी किंचित आघाडी मिळाली.

मात्र 11 व्या मिनिटाला महेंदर सिंगने केलेल्या अप्रतिम सुपर टॅकलमुळे यू मुम्बाला 12-10 अशी बढत मिळाली. लवकरच त्यांची आघाडी सहा गुणांवर गेली. सोनूने जोरदार चढाई केली होती. मुम्बाने त्याला व्यवस्थित टॅकल केल्याने जायंट्स पिछाडीवर पडले. पूर्वार्ध संपण्यास पाच मिनिटे असताना अत्राचलीने दोन जादुई क्षण निर्माण केले. प्रथम त्याने चढाईत प्रतिस्पर्धी कर्णधार सुरिंदर सिंगला बाद केले. त्यानंतर सुपर टॅकल करीत मुंबईची आघाडी 16-18 अशी कमी केली. दुसऱ्या सत्रात सोनूने चढाईत एक गुण मिळवित जायंट्सला मुम्बाशी बरोबरी साधून दिली. सोनूने यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्याने रिंकू सिंग व महेंदर यांना बाद करीत दोन मोठे गुण मिळविले आणि मुंबईचा एकच खेळाडू मॅटवर राहिला. पुढच्याच चढाईत त्यांनी मुम्बाला ऑल आऊट करीत 23-19 अशी आघाडीही घेतली.

सोनूच्या आणखी काही उत्कृष्ट चढायांमुळे तसेच जायंट्सच्या भक्कम बचावामुळे जायंट्सने 30 व्या मिनिटाला 30-22 अशी मोठी आघाडी मिळविली. गुमानने नंतर सलग तीन गुण घेतले आणि अष्टपैलू अमिरमोहम्मद झफरदानेश व प्रणय राणे यांनी केलेल्या जोरदार चढायांमुळे मुम्बाने 30-34 असे गुणांचे अंतर कमी केले. दोन मिनिटे बाकी असताना झफरदानेशने अत्राचली व मनुज यांना बाद करीत जायंट्सला ऑलआऊट करून मुम्बाला बरोबरी साधून दिली. मात्र अखेरच्या मिनिटाला सोनूने सुपर रेडमध्ये 3 गुण घेत जायंट्सला तिसरा विजय मिळवून दिला. त्याने तिसऱ्यांदा सुपर 10 गुण मिळविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article