गुजरात उपांत्यपूर्व फेरीत दाखल
वृत्तसंस्था / अहमदाबाद
2025 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत गुजरात संघाने हिमाचल प्रदेशचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. तर अन्य एका सामन्यात आंध्रप्रदेशने राजस्थानावर 6 गड्यांनी विजय मिळविला.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात हिमाचल प्रदेशने पहिल्या डावात 215 धावा जमविल्यानंतर गुजरातचा पहिला डाव 247 डावांवर आटोपला. हिमाचलने दुसऱ्या डावात 175 धावा केल्या. त्यानंतर गुजरातने 1 बाद 145 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी जिंकला. इलाईट ब गटातील हा प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना होता. गुजरातने या गटातून 31 गुणासह दुसरे स्थान मिळविले असून या गटात विदर्भ 34 गुणासह पहिल्या स्थानावर आहे. आता या गटातून गुजरात आणि विदर्भ हे बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
अन्य एका सामन्यात आंध्रने राजस्थानचा 6 गड्यांनी पराभव केला. राजस्थानने 7 बाद 95 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा डाव 114 धावांवर आटोपला आणि आंध्रला विजयासाठी 152 धावांचे आव्हान मिळाले. आंध्रने 31 षटकात 4 बाद 157 धावा जमवित विजय हस्तगत केला. राजस्थान आणि आंध्र या दोन्ही संघांना बाद फेरी गाठता आली नाही.
दिल्लीतील अन्य एका सामन्यात दिल्लीने रेल्वेचा 1 डाव आणि 19 धावांनी दणदणीत पराभव केल्याने कोहलीला दुसऱ्या डावात संधी मिळू शकली नाही. दिल्लीने बोनस गुण वसुल करत हा विजय मिळविला. या सामन्यात दिल्लीने पहिल्या डावात 374 धावा केल्या. त्यानतंर रेल्वेचा डाव 241 धावांत आटोपला. दुसऱ्या डावात रेल्वेला दिल्लीने केवळ 114 धावात उखडले.