महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुहागर - स्वारगेट एस. टी बस चालक- वाहकाला जबर मारहाण

04:14 PM Sep 22, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

खेड, शिवापूर टोलनाक्यावरील घटना

Advertisement

पुण्यातील राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Advertisement

प्रतिनिधी
गुहागर
गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर स्वारगेट एस. टी. बस चालक - वाहकाला पूणे येथील खेड, शिवापूर टोलनाक्यावर तिघांकडून जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरूवारी 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता घडली. याप्रकरणी पुण्यातील राजगड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागर आगारातून 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता गुहागर स्वारगेट ही एस. टी. फेरी चालक प्रविण भगवान नांगरे वय 34, वाहक एस. एन. कल्लुरकर घेऊन जात होते. या बसमध्ये 45 प्रवाशी प्रवास करत होते. एस. टी. बस चिपळूण, पाटण, उब्रज, सातारामार्गे पूणे असा प्रवास करत असताना बस खेड शिवापूर गावाच्या हद्दीतील टोलनाक्याजवळ आली असता, एका ट्रकने कट मारला. सदर ट्रक हा टोल पास करून पुढे वजन काट्यावर थांबला असता चालक प्रविण नांगरे यांनी ट्रकचालकाला याचा जाब विचारला. बसमध्ये प्रवासी असून त्यांना कमी जास्त झाल्यास कोण जबाबदार, असे विचारले असता टोल नाक्यावरील निळा टी शर्ट घातलेल्या मुलगा पुढे येऊन तु तरी कुठे एस. टी. निट चालवतो. असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली व शिवीगाळ करीत आपले नाव विशाल जाधव असे त्याने सांगितले. त्याच्या बरोबर आणखी दोन व्यक्तींनी काय झाले काय झाले असे म्हणत चालक प्रविण नांगरे यांना जबर मारहाण सुरू केली. सदर घटनेवेळी वाहकालाही मारहाण केली.
या मारहाणीमध्ये चालकाच्या पायाला, बरगडीला जबर मार बसला आहे. तोंडातून रक्त येत होते. अशा अवस्थेत प्रसंगावधान राखून वाहकाने एस.टी. चालवत स्वारगेटपर्यंत आणली. त्यानंतर चालक नांगरे व वाहक कल्लुरकर या दोघांवर तेथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. रात्री उशीरा तेथील राजगड पोलीस ठाण्यात तकार दाखल करण्यात आली. तर याप्रकरणी संशयित विशाल जाधव व अन्य दोन जणांवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत 132, 121(1), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक प्रविण नांगरे यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे, तर वाहक एस. एन. कल्लुरकर हे उपचार घेऊन गुहागर आगारात सेवेसाठी हजर झाले आहेत.

Advertisement
Tags :
# tarun bharat ratnagiri # tarun bharat news #
Next Article