पोलीस ठाण्यातच 'अग्नितांडव'! वायरलेस रूममधून धुराचे लोट आणि 60 सेकंदांचा तो थरार...
गुहागर पोलीस ठाण्यामध्ये विजेचा शॉर्टसर्किट
गुहागर -गुहागर पोलीस ठाण्यामध्ये मीटर पासूनची पुढे जाणारी वीज लाईन मध्ये शॉर्टसर्किट होऊन वायर ने पेट घेतला. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने अग्निशामन बाटल्याच्याद्वारे आग आटोक्यात आणून पुढील अनर्थ टळला.
गुहागर पोलीस ठाणे मधील ही घटना अतिशय मोठी घटना घडण्याची शक्यता होती. सकाळी 10:30 वाजता अचानक पोलीस ठाण्यामधील वायरलेस रूम मध्ये असलेल्या मीटर मधून बाहेर पडणाऱ्या वायरिंगनी पेट घेतला. सदर वायरिंग पुढे जळत जात असतानाच येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशामन बाटल्याद्वारे या जळणाऱ्या वायरवर मारा सुरू केला.
गुहागर पोलीस ठाण्यामधील एक बाटला आणि महसूल विभागात बाहेर ठेवण्यात आलेल्या दोन बाटल्याद्वारे मारा करत ही आग आटोक्यात आणण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला अशी जोरदार चर्चा सुरू होती. गुहागर पोलीस ठाण्याला लागून ट्रेझरी ऑफिस आणि त्यानंतर संपूर्ण महसूल कार्यालय इमारत आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला असे म्हणत सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. मीटर पासून पुढे वायर जळल्याने गुहागर पोलीस ठाण्याचा बराच वेळ वीज पुरवठा बंद होता.