For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुढीपाडवा... शाळा प्रवेश वाढवा... उपक्रमांतर्गत कोगे डिजिटल जि.प. शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा प्रवेश

01:40 PM Mar 31, 2025 IST | Pooja Marathe
गुढीपाडवा    शाळा प्रवेश वाढवा    उपक्रमांतर्गत कोगे डिजिटल जि प  शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा प्रवेश
Advertisement

कोल्हापूरः (कसबा बीड)

Advertisement

कोगे तालुका करवीर तसेच सर्व कसबा बीड, पाडळी खुर्द ते चाफोडी या सर्व गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गुढीपाडवा... शाळा प्रवेश वाढवा... या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदच्या सर्व मराठी शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

यामध्ये विशेष करून कोगे गावातील जिल्हा परिषद डिजिटल शाळा या शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठीच शिक्षण प्रसार, माझी शाळा माझा अभिमान.. गुढी ज्ञानाची,शिक्षणाची,पटाची.. गुढी पाडवा... पट वाढवा, प्रवेश वाढवा... अशा अनेक संकल्पनेतून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांची सुरुवात पटनोंदणीने व पहिलीच्या प्रवेशोत्सवाने करण्यात आली. चैत्रशुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील या प्रथम दिनी आध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत निश्चित करावा, या उद्देशाने 'गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम आज कोगे शाळेत राबविण्यात आला, गावातील पालकांनी गुढी पाडव्याला बालकांचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करुन पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ केला. १००% टक्के पटनोंदणी, नियमित उपस्थिती, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृती, स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्शन, डिजीटल शाळा, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना कोगे शाळेत शासकीय तसेच एम्पथी फाउंडेशन, ग्रामपंचायतच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जि. प. शाळा लोकाभिमुख होण्यास मदत झाली.खास आकर्षण ठरलेला "मी रोज शाळेत येणार" सेल्फी पॉईंट' पालकांसहित बालकांनाही कुतूहलाचा विषय झाला.

Advertisement

पालकांमध्ये असलेले इंग्रजी माध्यमाचे आकर्षण व इतर काही बाबींमुळे काही वर्षांपूर्वी शाळेचा पट कमी होताना दिसून येत होता. मात्र मागील २-३ वर्षात डिजिटल शाळा, कृतियुक्त अध्ययन- अध्यापन, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, नावीन्यपूर्ण उपक्रम या व इतर अनेक दर्जेदार उपक्रमांमुळे कोगे शाळेचा पट वाढत चालल्याचे चित्र आहे इंग्रजी शाळांची प्रत्येक गोष्टीची सक्ती आणि पालकांच्या परिस्थितीचा विचार न करता होणारी हेळसांड बघता गावातील बरेचसे विद्यार्थी गतवर्षी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सोडून कोगे शाळेत दाखल झाले आहेत, असे शालेय समिती अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, वृक्षास पाणी घालून, मुलांना खाऊ,टोपी देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मूल्यसंस्कार आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका नीता पाटील मॅडम, मुख्याध्यापिका चिनगोंडा मॅडम, सर्व अध्यापक, अध्यापिका, कुमार व कन्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पाटील, टी एन पाटील, नामदेव पाटील, सुहास पाटील, संजय मोरे सर व सर्व सदस्य उपस्थित होते. स्वागत कुमार विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका चिनगोंडा मॅडम यांनी केले. बालक व पालक यांचे कुमार व कन्या दोन्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने कन्या मंदिरचे मुख्याध्यापक एकनाथ बोटे यांनी आभार केले.

Advertisement
Tags :

.