For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुढी चैतन्याची, मांगल्याची!

01:05 PM Mar 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुढी चैतन्याची  मांगल्याची
Advertisement

आजपासून ‘पराभव’ नववर्षारंभ  : राज्यात अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

पणजी : वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून फार महत्त्व असलेला गुढीपाडवा अर्थात (संसार पाडवो) आज राज्यभरात मोठ्या उत्साहात धार्मिक व सांस्कृतिक कर्यक्रमांनी साजरा होणार आहे. दाते पंचांगकर्त्याच्या माहितीनुसार सकाळी 7.30 ते 10.30 या दरम्यान गुढी उभारण्यासाठी मुहूर्त सांगण्यात आला आहे. आजपासून नूतन वर्ष प्रारंभ होत असून घरोघरी दाराला तोरणे बांधून व दारात गुढी उभाऊन नूतन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. आजचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस असल्याने त्यानिमित्त संपूर्ण राज्यभर पारंपरिक, धार्मिक व सांस्कृतिक कर्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कडुनिंबाच्या पानाच्या सर्वांगाने औषधी असलेली चटणीप्राशन कऊन नवीन वर्षाची सुऊवात होणार आहे. आज दिवसभरात हिंदू बांधवांमध्ये पवित्र आणि शुभ मानण्यात येत असल्याने प्रत्यक्ष भेटीत, फोन करून, व्हॉटस् अॅप आणि अन्य माध्यमांद्वारे संदेश पाठवून एकमेकांना शुभेच्छा देणार आहेत.

घराच्या प्रवेशद्वारावर किंवा छतावर आनंद, सुख, समृद्धी आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानण्यात येणारी गुढी उभारणे हे गुढीपाडव्याचे मुख्य वैशिष्ट्या. ही गुढी म्हणजे एक सजवलेला बांबूचा खांब असतो. चमकदार वस्त्रs, आंब्याची पाने, साखरेचे खडे आणि सर्वात वर तांब्याचे किंवा चांदीचे भांडे ठेवून ही गुढी सजवली जाते. त्यामुळे घरात शुभशकुन येतात आणि नकारात्मकता दूर होते. गुढीपाडवा हा एक नवीन प्रारंभ मानला जातो, त्यामुळे नवीन उपक्रम हाती घेण्यासाठी, संकल्प करण्यासाठी आणि येणाऱ्या वर्षात यश व आनंदासाठी दैवी आशीर्वाद मागण्यासाठी हा एक आदर्श शुभसंयोग मानण्यात येतो. सणाच्या तयारीसाठी कुटुंबे आपल्या घरासह आतील सामानसुमानाची साफसफाई करतात. वाहनांना स्वच्छ धुवून पूजा करतात. घरे रांगोळ्या, आंब्याच्या पानांनी आणि तोरणांनी सजवली जातात. या सजावटीमुळे सुख-समृद्धी येते असा विश्वास आहे.

Advertisement

गुढीपाडव्यापासून पुढील वर्षभर आरोग्य, धन आणि सुखाचा आशीर्वाद मिळावा यासाठी भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू, भगवान गणेश आणि इतर देवतांची प्रार्थना करतात. काही घरांमध्ये पंचांग वाचनही करण्यात येते. नवीन कपडे, वस्तु, सोन्या चांदीचे दागिने यांची खरेदी करण्यात येते. हल्लीच्या वर्षांमध्ये आजच्या दिवशी वाहनांची सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी होते. नवीन वाहन घरात आल्यानंतर विधीवत पूजा अर्चा करून त्याचे स्वागत करण्यात येते. राज्यात पारंपरिक शिमगोत्सवाची सांगता झाल्यानंतर फाल्गुन महिना देखील संपुष्टात येतो. त्यानंतर अमावशा होऊन चैत्रमास प्रारंभ होतो. आजपासून पराभवनाम संवत्सर प्रारंभ होत आहे. यानिमित्त सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राज्यभरात प्रमुख शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागातही पहाटे मिरवणुका निघणार आहेत.

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगी गोव्याच्या जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. गुढीपाडवा सण पारंपरिक नववर्षाची सुऊवात असते. आशा व समृद्धीचे प्रतीक आहे. हा उत्सव आपल्या देशाचा समृद्ध असा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो आणि आपल्याला सलोखा, एकता व सामूहिक प्रगती या शाश्वत मूल्यांची आठवण करून देतो, असे राज्यपालांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगी राज्यातील जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने नववर्षाची सुऊवात होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने, मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.