कारवाईच्या बडग्याने अपघात टाळण्यासाठी वारणा कॅनॉलवर संरक्षक रेलिंग
रेंगाळलेल्या पुलाच्या कामाने सात बळी गेल्यावर प्रशासनाला उपरती
वारणानगर प्रतिनिधी
वारणा प्रकल्पाचे निधी अभावी गेली काही वर्षे काम बंद राहिले आहे.पन्हाळा तालुक्यात कॅनॉलवर होणाऱ्या पुलाचे काम रेंगाळल्याने आजवर सात बळी गेले आहेत या अनुषंगाने होणाऱ्या कारवाईच्या बडग्याने सद्या पूल होणाऱ्या ठिकाणी संरक्षक रेलिंग उभारण्याचे काम पूर्ण करण्याची उपरती या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना झाली आहे.
पोखले - कोडोली (ता.पन्हाळा) रोडवर वारणा कॅनॉलवरील पुलाचे काम गेली काही वर्षे रेंगाळले आहे तसेच पूल होणाऱ्या ठिकाणी संरक्षित कठडा अथवा रेलिंग असे आपघात सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाय योजना केल्या नव्हत्या यामुळे कोडोली - पोखले रोडवरून दि. १२ डिसेंबर रोजी रात्री उशिरा जात असताना मोटर सायकलचा वेग न आवरल्याने वारणा कॅनॉल मध्ये (कालव्यात) पडून सूरज रमेश जाधव वय २३ रा. देवाळे ता. पन्हाळा हा ठार झाला.
विनायक राजाराम जाधव यानी याबाबत दिलेल्या फिर्यादीत सदर अपघातात पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी नोंद झाली आहे.
कॅनॉलमध्ये पडून आजवर पन्हाळा तालुका हद्दीत सात जनांचा बळी गेला तथापी सातवा बळी गेलेल्या सूरज च्या नातेवाईकानी याची गंभीर दखल घेत फिर्याद दिल्याने कोडोली पोलीसानी वारणा प्रकल्पाचे अधिकारी अमोल कमलाकर तसेच पुलाच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारास चौकशी साठी बोलवल्याने प्रकल्पाचे कामकरणाऱ्या यंत्रानेस खडबडून जाग आली आणि कारवाईच्या बडग्याने पन्हाळा तालुक्याच्या हद्दीत जिथे पुलाचे काम सुरु आहे तिथे संरक्षक रेलिंग उभारण्याचे काम सुरू केले आहे.
वारणा कॅनॉलचे निधी उपलब्ध नाही म्हणून काम बंद आहे परंतु याच कॅनॉलवर जिथे पुल बांधायचे आहे तेथील रस्ते देखील उकरून टाकले जिथे पुलाचे काम सुरू आहे ती कामे गेली काही वर्षे रेंगाळली आहेत असे असताना त्यांना काम पूर्ण करण्यास मुदत का ? वाढवून देण्यात आली पुलाचे काम सुरू करताना शासन नियमाचे पालन ठेकेदाराने का ? केले नाही यांना कोणते अधिकारी पाठबळ देतात यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.