For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार
Advertisement

सावंतवाडी/ प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळपीक विमा नुकसानभरपाईच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सन २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व त्रुटी दूर करून पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई देण्यासंदर्भात निर्देश पालकमंत्री श्री राणे यांनी दिले या विषयासंदर्भात भाजपचे नेते आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी लढा सुरू केला होता. पालकमंत्री नितेश राणे यांनी याकडे लक्ष घालत हा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेता येतील का हे लक्षात घेऊन मुंबई मंत्रालयात त्यांनी ही बैठक बोलावली. या बैठकीला माझी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनाही प्राचारण करण्यात आले होते त्यांनी तेथे उपस्थिती दर्शवली.

Advertisement

हवामानातील बदल व तापमानवाढीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये तांत्रिक नोंदी व कागदपत्रांतील त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाईचा लाभ मिळू शकलेला नाही. या सर्व त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच काही विमा प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटींमुळे रद्द झाल्याचे निदर्शनास आले असून, त्या प्रकरणांची पूर्तता करून प्रस्ताव पुन्हा कार्यान्वित करावे. हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक बाबी, महसूल मंडळांच्या नोंदी आणि विमा दाव्यांतील अडचणी सोडविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी आयुक्त, पुणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, सीएससीचे व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आदी उपस्थित होते. कृषी आयुक्त, पुणे व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

Advertisement

Advertisement
Tags :

.