शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास पालकमंत्री, लोकप्रतिनिधी निष्क्रिय
रुपेश राऊळ यांची टीका
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास पालकमंत्री ,आमदार ,खासदार निष्क्रिय ठरले आहेत. व प्रशासनावर त्यांचा अंकुशच नसून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब हे आक्रोश मोर्चा काढत आहेत . त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी आक्रोश मोर्चा काढावाच. उगाच नौटंकी करू नये. शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषद केली . यावेळी त्यांनी मळगाव अपघातात बळी गेलेले मॅथ्यू यांच्याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींना काहीच का वाटले नाही असा सवालही केला. आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या जिल्हाप्रमुखांवर आली यावरूनच यांचे सरकार निष्क्रिय आहे हे दाखवून दिले आहे. तसेच सरकारने आठ दिवसात जर भरपाई दिली नाही तर आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोझा ,चंद्रकांत कासार ,रमेश सावंत ,अनुप नाईक, संदीप गवस, अशोक धुरी ,प्रशांत बुगडे, उमेश नाईक ,शिवदत्त घोगळे ,विनायक ठाकूर आदी उपस्थित होते.