प्रशासनाने गतिमान आणि पारदर्शक कारभाराने जनतेच्या समस्या सोडवाव्यात
पालकमंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन; सावंतवाडीत उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
सावंतवाडी प्रतिनिधी
प्रशासनाने गतिमान आणि पारदर्शक कारभार करून जनतेच्या समस्या सोडवाव्यात असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे केले उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते सावंतवाडी येथे झाले.यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले,महसूलचे पुणे उपसंचालक हेमंत निकम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सहाय्यक अभियंता अजित पाटील ,जिल्हा बँक संचालक विद्याधर परब ,भाजपचे राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष लखमराजे भोसले,उपविभागीय अधिकारी समीर घारे, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.पालकमंत्री नितेश राणे म्हणाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपविभागीय दंडाधिकारी इमारतीसाठी निधी प्राप्त करून दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत.ही इमारत दोन वर्षात नव्हे तर एका वर्षात पूर्ण झाली पाहिजे असा माझा आग्रह आहे. इमारत सुसज्ज असणार आहे. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांना बसण्यासाठी केबिन उपलब्ध होणार आहेत. मात्र, सुसज्ज इमारत होत असताना गतिमान आणि पारदर्शक कारभार झाला पाहिजे. जनतेचे प्रश्न ,समस्या या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्वरित सोडवले पाहिजेत. कारण ,ग्रामीण भागातून जनता आपले प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींकडे येत असते. प्रश्न ,समस्या असतात म्हणून जनता येत असते. त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवणे हे अधिकारी, कर्मचारी लोकप्रतिनिधींचे काम आहे. या कार्यालयातून जनतेचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.सावंतवाडी विभागातील तीनही तालुक्यात पुढील काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे.त्यामुळे येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील प्रशासनाने त्वरित निर्णय देणे आवश्यक आहे असे सांगत जनतेचे प्रश्न न सुटल्यास कार्यालयांना टाळे लावण्याची व्यवस्था आम्ही करू शकतो. हे प्रशासनाने लक्ष लक्षात घ्यावे. प्रश्न सोडवण्याची माझी वेगळी भूमिका असते. तर आमदार दीपक केसरकर हे प्रेमाने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मी ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधील खेळाडू आहे. तर आमदार दीपक केसरकर कसोटीतील खेळाडू आहेत. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यात दोघांच्या भूमिका वेगळे असल्या तरी जनतेचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. दोघेही जण यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देणार आहोत.पालकमंत्री नितेश राणे यांनी या भागातील महसूल बाबत आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत याची नोंद येतील अधिकाऱ्यांनी घ्यावी असा इशाराही यावेळी दिला.आमदार दीपक केसरकर यांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाची इमारत या विभागासाठी महत्त्वाची होती. ही इमारत होत असताना लोकांचे समस्या सुटणे आवश्यक आहे.त्या दृष्टीने प्रशासनाने लक्ष घालावे असे आवाहन केले प्रास्ताविकात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात गतिमान आणि पारदर्शक कारभार सुरू आहे. लोकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ही इमारत लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.उपविभागीय अधिकारी समीर घारे यांनी या विभागातील तक्रारी येणार नाही याची दखल आपण घेऊ जनतेला अपेक्षित असा कारभार करण्यात येईल अशी ग्वाही दिली. उपस्थितांचे स्वागत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,उपविभागीय अधिकारी घारे यांनी केले.यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, सुधीर आडिवरेकर ,दिपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, आनंद नेवगी ,देव्या सूर्याजी सुनिता पेडणेकर, प्रतीक बांदेकर, सुकन्या टोपले ,सायली दुभाषी ,स्नेहा नाईक तसेच प्रसाद अरविंदेकर, बंटी पुरोहित महसूल बांधकामचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.