पालकमंत्री नितेश राणेंचा वाढदिवस माऊली कर्णबधीर विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा
न्हावेली / वार्ताहर
कोंडुरा येथील माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयाला राज्याचे बंदरे व मत्स्योद्योग मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा भाजप व प्रमोद कामत मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसाठी दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली.यासोबतच विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस जावेद खतीब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यालयाच्या गरजा ओळखून भविष्यातही आवश्यक ती मदत केली जाईल,असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती संदिप नेमळेकर,वाफोली सरपंच उमेश शिरोडकर,उपसरपंच विनेश गवस,बांदा मंडळाचे माजी अध्यक्ष महेश धुरी,मधुकर देसाई,अशोक सावंत,दिपक सावंत,विलास पावसकर,संजय नाईक,ज्ञानदीप राऊळ,ज्ञानेश्वर सावंत,सिद्धेश कांबळी,आत्माराम गावडे,नीलेश नाटेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.