सरकारी अधिकारी गेंड्याच्या कातडीचे; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा संताप
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेची ग्राहाणी ऐकून घेतली. जनतेची वेळेवर कामे होत नसल्याने मंत्री मुश्रीफ यांनी सरकारी अधिकारी गेंड्याच्याकातडीचे आहेत असा संताप व्यक्त करत आपल्या कामासाठी जनतेनेच पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात लोकांची गाऱ्हाणी ऐकली. यावेळी जिल्हयातून आलेल्या लोकांनी निवेदनाद्वारे आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये बहुतांश समस्या महसूलशी निगडित आणि जागेसंबंधी होत्या. मंत्री मुश्रीफ यांनी समस्या ऐकून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या. तर अनेक ठिकाणी कामे रखडल्या बद्दल अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. सरकारी अधिकारी म्हणजे गेंड्याच्या कातडीचे आहेत असा संताप व्यक्त करत आपली कामे होण्यासाठी जनतेनेच पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
महसूल खाते म्हणजे आरं रं रं......
महसूल खात्यातील लोकांकडून कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उद्विग्नता व्यक्त केली.महसूल खाते म्हणजे आरं रं रं.... जनतेने मरायलाच पाहिजे असे मुश्रीफ म्हणाले.