महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार

12:28 PM Nov 25, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

ऊसदर आंदोलनामध्ये सन्मानजनक तोडगा काढल्याबद्दल मानले आभार

Advertisement

कागल प्रतिनिधी

Advertisement

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनामध्ये सन्मानजनक तोडगा काढून गळीत हंगाम सुरळीत सुरू केल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कालच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दूरध्वनीवरून आंदोलनातील सन्मानजनक तोडग्याबद्दल धन्यवाद मानले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही समन्वयाची भूमिका घेतल्यामुळे सन्मानजनक तोडगा काढून हंगाम सुरळीत सुरू झाला.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले, ऊसदर आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या भावना, शेतकरी संघटनेची भूमिका आणि साखर कारखाने यांच्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी समन्वयाने चर्चा घडवून आणली आणि चांगला तोडगा काढला.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, अविनाश मगदूम, कसबा सांगाव ग्रामपंचायत सदस्य दिपक हेगडे, संतोष मगदूम, कुमार पाटील, अनिल माने, निलेश चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.

Advertisement
Tags :
hasanmushrifsugarcaneratetarunbharatusdarandolan
Next Article