For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात 4 हजार कोटींच्या गुंतवणुकीची हमी

11:01 AM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्यात 4 हजार कोटींच्या गुंतवणुकीची हमी
Advertisement

उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली जपान दौऱ्याविषयी माहिती : उद्योजकांशी चर्चा

Advertisement

बेंगळूर : मागील आठवड्यात जपान दौऱ्यावेळी तेथील विविध उद्योजकांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडून कर्नाटकात 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार असल्याची हमी मिळाली आहे, अशी माहिती मोठे आणि मध्यम उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. सोमवारी बेंगळूरमधील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. भांडवल गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने आपण दुसऱ्यांदा जपानचा दौरा केला. जपानी उद्योजक हे पारंपारिक विचारसरणीचे आहेत. निर्णय घेण्यापूर्वी ते दीर्घ विचार करतात. देशातील 50 टक्के जपानी कंपन्या कर्नाटक राज्यात आहेत.

यापूर्वी मी जपान आणि दक्षिण कोरियाचा दौरा केला होता, तेव्हा 6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित झाली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळच्या जपान दौऱ्यात राज्यात होंडा सारख्या कंपन्यांचा विस्तार, मुकुंद सुमी स्टील्स कंपनीशी भागीदारीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अमेरिकेने इलेक्ट्रॉनिक्स आणि फार्मा उत्पादने वगळता सर्व भारतीय उत्पादनांवर 50 टक्के आयात शुल्क लादले आहे. यामुळे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना निर्णय घेणे कठीण होते. तथापि, जपान दौऱ्यात 4,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा ओघ येण्याची शाश्वती मिळाली आहे, असे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.