महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गॅरंटी योजनांमुळे सर्वजाती-धर्मातील महिलांना मदत

10:32 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रियांका जारकीहोळी : महिला संघटना पदाधिकाऱ्यांची भेट

Advertisement

बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांची घोषणा करून त्यांची समर्पकपणे अंमलबजावणी केली आहे. याद्वारे त्यांनी दिलेले वचन पाळले आहे. या गॅरंटी योजनांची सर्व जाती-धर्मातील महिलांना मदत झाली आहे, असे चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. गोकाक हिल गार्डन येथे महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. पक्ष संघटनेसाठी महिला कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्या बोलत होत्या. काँग्रेसने राज्यात जारी केलेल्या गॅरंटी योजनांची मदत तळागाळापर्यंत पोहोचविण्यात सरकारला यश आले आहे. याची जाणीव मतदारांना आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात काँग्रेसचे वारे वाहत आहे. त्यामुळे भविष्यात मतदार संघाच्या विकासासाठी मला संधी देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणासह क्रीडा, कौशल्य विकास यासाठी सतीश जारकीहोळी फौंडेशनकडून मदत केली जात आहे. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी महिलांनी तयार राहावे, जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article