For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

दक्षिण गोव्याची जागा जिंकण्यासाठी फोंड्यात मोठ्या मताधिक्क्याची ‘गॅरंटी’

11:34 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण गोव्याची जागा जिंकण्यासाठी फोंड्यात मोठ्या मताधिक्क्याची ‘गॅरंटी’

फोंड्यातील सभेत मुख्यमंत्र्यांचा विश्वास : व्यापारी व नागरिकांशी साधला संवाद

Advertisement

फोंडा : केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजपा सरकारने उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना मार्गी लावल्या. दळणवळणाच्या दृष्टीने आवश्यक असलेले बगलमार्ग व महामार्गांचा विकास सातत्याने होत आहे. फोंड्यातील बगलरस्त्यांचे काम तसेच नवीन चौपदरी बोरी पूल लवकरच मार्गी लागणार आहे. फोंडा मतदारसंघाने भाजपाला नेहमीच प्रेम दिले. कृषीमंत्री रवी नाईक यांना निवडून देत पहिल्यांदा फोंड्यात कमळ फुलविले. आता लोकसभा निवडणुकीत 80 टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्याने दक्षिण गोव्यातील भाजपा उमेदवाराला विजयी करण्याची ‘गॅरंटी’ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागितली. विकसित भारत अंतर्गत फोंड्यातील व्यापारी व नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. शांतीनगर फोंडा येथील ऊक्मिणी सभागृहात बुधवारी सकाळी ही सभा झाली. कार्यक्रमाला व्यासपीठावर फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक, माजी खासदार तथा प्रदेश भाजपाचे सरचिटणीस अॅड. नरेंद सावईकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष अॅड. मनोहर आडपईकर, फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, नगरसेवक आनंद नाईक व महिला मोर्चा अध्यक्ष अनिता कवळेकर या उपस्थित होत्या. उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना राबवितानाच त्याला पुरक अशा साधनसुविधा भाजपा सरकारने निर्माण केल्या आहेत. या उद्योगस्नेही योजनांसाठी   पूरक मनुष्यबळ ही मोदी सरकारची हमी आहे. नवीन औद्योगिक धोरण, स्टार्टअप धोरण, सुटसुटीत जीएसटी करप्रणाली यामधून भाजपा सरकारने उद्योजकांना आश्वस्त केले आहे. चांगला उद्योग व चांगले जीवनमान यासाठी पुन्हा एकदा केंद्रात पंततप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेवर येण्यासाठी गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

 उद्योगस्नेही योजनांचा लाभ घ्यावा

Advertisement

केंद्र व राज्य सरकारच्या विविध उद्योगस्नेही योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून आढावा घेतला. पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत 35 टक्के सवलत व हल्लीच राज्य सरकारने राबविलेल्या मुख्यमंत्री रोजगार योजनंअंतर्गत दोन टक्के व्याजदरात ईडीसीमार्फत कर्ज योजना सुऊ केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलावर्ग घरबसल्या कॅटरिंग किंवा अन्य लघुउद्योग सुरु करु शकतात. तसेच आरडीएमध्ये नोंद असलेल्या स्वयंसाहाय्य गटांना व्यावसायासाठी दोन टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे.

Advertisement

 लाभ मिळाला नसेल तर संपर्क साधा

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमुळे देशातील निरनिराळ्या अठरा पारंपरिक व्यावसायिकांना स्वत:ची ओळख करुन दिली आहे. या योजनेखाली उपकरणे खरेदीसाठी ऊ. 17,500 चे थेट आर्थिक साहाय्य व व्यावसायासाठी एक लाखाची बँक गॅरेंटी ही मोदी सरकारची हमी आहे. अर्ज कऊन जर कुणाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल, तर त्यांनी थेट आल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. रितेश नाईक यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन आनंद नाईक यांनी तर अनिता कवळेकर यांनी आभार मानले. तत्पूर्वी फर्मागुडी येथील फार्मसी महाविद्यालयाच्या आवारात संकल्पपत्र अभियान अंतर्गत नवमतदारांशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संवाद साधला व मोदी सरकारच्या तरुणांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

व्यापाऱ्यांची निराशा

फोंड्यातील या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या समस्या मांडता येतील या आशेने आलेले व्यापारी व बाजारातील विक्रेत्यांची निराशा झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या व सूचना सूचनापेटीत टाकण्याची घोषणा केल्याने त्यांचा निऊत्साह झाला. समाजकार्यकर्ते विराज सप्रे यांनी फोंड्यातील सार्वजनिक आरोग्याची चालेली परवड, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित समस्या, खराब रस्त्यांमुळे जनतेचे होणारे हाल या समस्या लेखी सूचना पेटीत टाकून आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत पाठवयाच्या नाहीत, असे सांगितले. स्थानिक पातळीवरील हे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी नगरसेवक, आमदार व राज्य सरकारची आहे. त्यासाठीच जनतेने त्यांना निवडून दिले आहे. दिल्लीतून फोंड्याच्या समस्या सोडवायच्या झाल्यास राज्यात सरकार हवेच कशाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशाप्रकारे प्रचारकी सभा आयोजित करण्यापेक्षा जनतेला त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याची संधी मिळायला हवी, अशी सूचनाही त्यांनी केली.

Advertisement
Tags :
×

.