महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरातचा लखनौवर सात धावांनी विजय

08:38 PM Apr 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हार्दिक पांड्याचे दमदार अर्धशतक, राहुलचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील शनिवारी येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्सचा पराभव करत आपला चौथा विजय नोंदवला. लखनौचा कर्णधार केएल राहुलचे अर्धशतक मात्र वाया गेले. 17 धावात 2 गडी बाद करणाऱ्या मोहित शर्माला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेतील हा 30 वा सामना होता.

स्पर्धेच्या गुणतक्त्यात आता गुजरातने 8 गुणासह चौथे स्थान मिळवले आहे. तर लखनौ सुपरजायंट्स आठ गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र लखनौचा या स्पर्धेत गुजरातपेक्षा एक सामना अधिक झाला आहे.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकात 6 बाद 135 धावा जमवल्या. सलामीचा शुभमन गिल खाते उघडण्यापूर्वीच कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्यानंतर साहा आणि कर्णधार हार्दिक पांड्या संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 9.1 षटकात 68 धावांची भागीदारी केली. कृणाल पांड्याने साहाला झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 6 चौकारासह 47 धावा जमवल्या. गुजरातने पॉवर प्ले दरम्यान 40 धावा जमवताना एक गडी गमवला होता. अभिनव मनोहर केवळ 3 धावावर बाद झाला. विजय शंकरने 1 चौकारासह 10 तर डेविड मिलरने 6 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 50 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारासह 66 धावा जमवल्या. तेवातिया 2 धावावर नाबाद राहिला. गुजरातचे शतक 101 चेंडूत फलकावर लागले. स्टोइनिसने हार्दिक पांड्याला राहुलकरवी झेलबाद केले. तो डावातील शेवटच्या षटकात बाद झाला. तर डेविड मिलर या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तंबूत परतला. गुजरातच्या डावामध्ये 4 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. लखनौच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि टिचून गोलंदाजी केली. कृणाल पांड्या आणि स्टोइनिस यांनी प्रत्येकी 2 तर नवीन उल हक आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार केएल राहुल आणि मेयर्स या सलामीच्या जोडीने 6.3 षटकात 55 धावांची भागीदारी केली. लखनौने पॉवर प्ले दरम्यान 53 धावा जमवल्या होत्या. लखनौचे पहिले अर्धशतक 33 चेंडूत फलकावर लागले. लखनौची ही सलामीची जोडी रशीद खानने फोडली. रशीदच्या गोलंदाजीवर मेयर्सचा त्रिफळा उडाला. त्याने 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 24 धावा जमवल्या. मेयर्स बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कृणाल पांड्याने राहुलला चांगली साथ दिली. या जोडीने 8 षटकात 51 धावांची भागीदारी केली. लखनौचे शतक 79 चेंडूत फलकावर लागले. राहुल आणि कृणाल पांड्या यांनी 45 चेंडूत 50 धावांची भर घातली. यावेळी लखनौचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. नूर अहमदने कृणाल पांड्याला साहाकरवी यष्टीचित केले आणि या घटनेने सामन्याला कलाटणी मिळाली. कृणाल पांड्याने 23 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 23 धावा जमवल्या. नूर अहमदने पुरनला केवळ एका धावेवर तंबूत धाडले. केएल राहुलने 61 चेंडूत 8 चौकारासह 68 धावा जमवल्या. तो डावातील शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर यादवने राहुलला टिपले. या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टोइनिस खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. चौथ्या चेंडूवर आयुष बदोनी धावचित झाला. त्याने 6 चेंडूत 8 धावा जमवल्या. दीपक हुडा या षटकातील पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 2 धावा जमवल्या. लखनौला यावेळी विजयासाठी आणखी सात धावांची जरुरी होती पण त्यांच्या मंकड आणि बिस्नोई या जोडीला शक्य न झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. डावातील शेवटच्या षटकामध्ये लखनौने आपले चार फलंदाज गमवले. लखनौच्या डावात 2 षटकार आणि 12 चौकार नोंदवले गेले. त्यांच्या पहिल्या तीन फलंदाजांनी केवळ दुहेरी धावसंख्या गाठली. चपळ क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या सत्रातील अचूक गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने हा सामना सात धावांनी जिंकला. गुजराततर्फे मोहित शर्मा आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी 2 तर रशीद खानने एक गडी बाद केला. लखनौचे दोन फलंदाज धावचित झाले.

संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकात 6 बाद 135 (साहा 47, गिल 0, हार्दिक पांड्या 66, मनोहर 3, विजय शंकर 10, मिलर 6, तेवातिया नाबाद 2, अवांतर 1, कृणाल पांड्या 2-16, स्टोइनिस 2-20, नवीन उल हक1-19, अमित मिश्रा 1-9), लखनौ सुपर जायंट्स 20 षटकात 7 बाद 128 (केएल राहुल 68, मेयर्स 24, कृणाल पांड्या 23, बडोनी 8, पुरन 1, हुडा 2, अवांतर 2, मोहित शर्मा 2-17, नूर अहमद 2-18, रशीद खान 1-33).

Advertisement
Tags :
#ipl2020#sports#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article