कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यात 40 कोटींचा जीएसटी घोटाळा

01:15 PM Aug 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घोटाळ्याच्या सूत्राधाराच्या चेन्नईत आवळल्या मुसक्या : माहिती मिळाल्यानंतर डीजीजीआयने केली कारवाई,घोटाळा तब्बल शंभर कोटांपर्यंत जाण्याची शक्यता 

Advertisement

पणजी : राज्यात जीएसटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ माजली असून हे प्रकरण सरकारच्या लक्षात कसे आले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा घोटाळा खुद्द जीएसटीच्या गुप्तचर महासंचालनालयाच्या गोवा विभागाने (डीजीजीआय) उघड केला असून, या प्रकरणात एका संशयिताला चेन्नई येथून अटक केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा घोटाळा आता केवळ 40 कोटींचा असल्याचे उघड झाले असले तरी तो तब्बल शंभर कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील संशयिताला म्हपसा येथील न्यायालयात हजर केले असता त्याला अगोदर जीएसटी कोठडी ठोठावण्यात आली. ती संपल्यानंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान संशयिताने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Advertisement

बनावट बिलांद्वारे पैसे उकळले   

या घोटाळा प्रकरणात जीएसटी गोवा विभागाने अटक केलेल्या आंतरराज्य टोळीच्या सूत्रधाराचे नाव पुखराज किशन राम (मूळ, राजस्थान) असे आहे. राज्यात दोन आस्थापने सुरू करून बनावट बिलांच्या (जीएसटी पावती) आधारे हा घोटाळा करण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. बनावटे बिले पाठवून त्याद्वारे रक्कम उकळण्यात येत होती. यासंदर्भाची माहिती डीजीजीआयला मिळाल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

डीजीजीआयला मिळाली माहिती

उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यात दोन आस्थापनांच्या माध्यमातून जीएसटी घोटाळा होत असल्याची माहिती गोवा विभागाच्या जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाला (डीजीजीआय) मिळाली होती.

शिवोली, म्हापसाहून रॅकेट 

डीजीजीआयला मिळालेल्या माहितीनुसार विभागाचे उपसंचालक शिबी सिंग घरवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने सखोल चौकशी केली असता बार्देश तालुक्यातील शिवोली आणि म्हापसा येथे ‘संदीप होम अप्लायन्सेस’ आणि ‘अभिषेक होम अप्लायन्सेस’ या दोन आस्थापनांद्वारे बनावट बिलांच्या माध्यमातून जीएसटी घोटाळा होत असल्याचे समोर आले.

बनावट कंपन्या, बनावट कागदपत्रे 

डीजीजीआयने ‘संदीप होम अप्लायन्सेस’ आणि ‘अभिषेक होम अप्लायन्सेस’ या दोन्ही आस्थापनांची माहिती मिळविली असता दोन्ही कंपन्या बनावट असल्याचे उघड झाले. तसेच दोन्ही कंपन्या स्थापन करण्यासाठी संशयितांनी घरमालक आणि दुकानमालकाकडे भाड्याबाबत करार केले होते. त्यासाठी संशयितांनी बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे दिली होती.

सूत्रधाराच्या चेन्नईत आवळल्या मुसक्या

घोटाळा प्रकरणामध्ये राजस्थानातील अधिकाधिक लोक सहभागी असून, गोव्यातील काही आस्थापनांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन जीएसटी विभागाने सखोल चौकशी केली असता, घोटाळा प्रकरणातील सूत्रधार चेन्नईत असल्याचे समोर आले. एक पथक चेन्नई येथे पाठविण्यात आले. पथकाने चेन्नई येथे दाखल होऊन सूत्रधार पुखराज किशन राम याच्या मुसक्या आवळल्या. त्याला चेन्नईतील न्यायालयात हजर करुन ट्रान्झीट रिमांडवर गोव्यात आणले आहे. जीएसटी कर चोरीसाठी गोव्यात स्थापन केलेली दोन्ही आस्थापने बनावट असल्याचे उघड झाले असून संशयितांनी बनावट आधारकार्डद्वारे बँक खाते उघडले होते. तसेच या बँक खात्याद्वारे ‘इनपूट टॅक्स क्रेडिट’ दावा करत होते. या प्रकरणात केलेल्या प्राथमिक तपासात 40 कोटी ऊपयांची जीएसटी करचोरी केल्याचे उघड झाले आहे. यात राजस्थान, गोवा, चेन्नई, महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील संशयितांचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article