For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फेब्रुवारीमध्ये जीएसटी 1.83 लाख कोटी जमा

06:13 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
फेब्रुवारीमध्ये जीएसटी 1 83 लाख कोटी जमा
Advertisement

संकलनात 8 टक्क्यांची वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फेब्रुवारी 2026 मध्ये वस्तू आणि सेवा कर संकलन वार्षिक आधारावर 8.1 टक्क्यांनी वाढून 1.83 लाख कोटी रुपये इतके झाले. हे संकलन गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात 1.69 लाख कोटी रुपये इतके होते. यापूर्वीच्या म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये जीएसटी संकलन 1.71 लाख कोटी इतके झाले होते.

Advertisement

आर्थिक वर्ष 2026 च्या सुरुवातीपासून म्हणजेच एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या कालावधीत जीएसटी संकलन 20 लाख 27 हजार 033 कोटी रुपये इतके झाले आहे. हे वार्षिक आधारावर 8.3 टक्के वाढ दर्शवते. त्यापूर्वीच्या वर्षी याच कालावधीत जीएसटी संकलन 18 लाख 71 हजार 670 कोटी रुपये झाले होते.

फेब्रुवारीमध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) संकलन 37,473 कोटी होते, तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) 45,900 कोटी रुपये होते. एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) 1,00,236 कोटी रुपये झाले. फेब्रुवारी 2026 मध्ये सरकारचे उपकर संकलन 5,063 कोटी इतके झाले असून वार्षिक आधारावर उपकर संकलनात लक्षणीय घट दिसून आली आहे.

महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकने फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन नोंदवले. त्यानंतर हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, लडाख, मिझोराम, नागालँड आणि मणिपूर हे सर्वात कमी जीएसटी संकलन असलेल्या राज्यांमध्ये समाविष्ट आहेत.

Advertisement
Tags :

.