जानेवारीतील जीएसटी 1.93 लाख कोटी
वार्षिक आधारावर 6 टक्के महत्त्वपूर्ण वृद्धीची नोंद : डिसेंबरचे कलेक्शन 1.75 लाख कोटी होते.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंदाजपत्रक सादर करताना जीएसटीचे जानेवारी महिन्यातील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जानेवारीमधील जीएसटी कलेक्शन 1.93 लाख कोटी झाले आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीतील कलेक्शनपेक्षा हा आकडा 6.2 टक्क्यांनी वाढल आहे. तर गेल्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये 1.75 लाख कोटी रुपये वसूल झाले होते. तर एकूण रिफंडमध्ये 3.1 टक्के वजावट झाली आहे. आणि हा आकडा आता 22 हजार 665 कोटी झाला आहे. जानेवारीमध्ये सेवा आणि महसूलमध्ये 7.6 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ती 1.71 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
दरम्यान, तंबाखू उत्पादनांपासून उपकरातून जानेवारीमध्ये 5768 कोटी रुपयांची प्राप्ती झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. गतवर्षी जानेवारीमध्ये हाच आकडा 13हजार 9 कोटी होता. तथापि त्यावेळी तंबाखू उत्पादनांवर लक्झरी कर, हानीकारक आणि अहितकारक वस्तू कर लागत होता. मात्र सरकारने 22 सप्टेंबर 2025 पासून 375 वस्तुंवरील जीएसटी दर कमी केला होता. त्यामुळे अशा उत्पादनांसाठी लागणाऱ्या वस्तुंची किंमत कमी झाली होती. त्यामुळे या वर्गातील जीएसटी कलेक्शनमध्ये वजावट झाली आहे. सध्या केवळ तंबाखू आणि त्यांच्या उत्पादनांवर क्षतिपूर्ती उपकर लावला जात आहे. त्याचा परिणाम या वर्गातील जीएसटी कलेक्शनवर झाल्याचे समोर आले आहे.
जीएसटी कमी केल्याने विक्रीत वाढ
दुसरी 375 वस्तुंवरील जीएसटी दर कमी केल्याने घरगुती वापराच्या वस्तुंच्या विक्रीमध्ये मोठी झेप नोंदवली गेली आहे. या उपकरणांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याने या वर्गातील जीएसटी कलेक्शनही मोठ्या प्रमाणात म्हणजे 4.8 टक्के वाढला आहे. यातून एकूण जेसटी कलेक्शन 1.41 लाख कोटी झाले आहे. तर आयातीमधील महसूही 10.1 टक्का वाढला आहे. यातून 52253 कोटी महसूल निर्मिती आणि वसुली झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि कर तसेच उपकरांच्या वसुलीमध्ये भरभक्कम वाढ या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू मजबुतीकडे आणि स्थिरतेकडे वाटचाल करत असल्याचेही यामुळे स्पष्ट होऊ लागले आहे. एकूण आकडेवारी भारतीय उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील वाढ ठळकपणे दर्शवत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
डिसेंबर 2025मध्ये डिसेंबर 2024च्या तुलनेत 6.1 टक्का वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर 24मध्ये जीएसटी कलेक्शन 164556 कोटी होती. ते डिसेंबर 25
मध्ये 174550 कोटी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कालावधीमध्ये रिफंडमध्ये वाढ झाली आहे. वार्षिक तुलनेच्या आधारावर ही वाढ 30.9 टक्के दिसत आहे. निर्यात करातूनही 19.7 टक्के वाढ होऊन 51977 कोटी महसूल वसुल झाला आहे.