For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात जीएसटी संकलन आठ टक्क्यांनी घटले

02:39 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात जीएसटी संकलन आठ टक्क्यांनी घटले
Advertisement

पणजी : गोवा राज्यातील मे 2026 चे जीएसटी संकलन मागील वर्षाच्या (मे 2025)  तुलनेत 8 टक्क्यांनी घटले असून ते रु. 582 कोटी वरून (2025) रु. 535 कोटीपर्यंत (2026) खाली आले आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही घट समोर आली आहे. त्यानुसार मे 2026 मध्ये गोव्यातील नोंदणीकृत जीएसटी करदाते 50,001 आहेत. मे महिन्यातील देशाचे जीएसटी संकलन वाढलेले असताना गोव्याचे संकलन मात्र कमी झाले आहे. देशाचे जीएसटी संकलन 3.2 टक्क्यांनी वाढलेले असताना गोव्याचे मात्र 8 टक्क्यांनी कमी झाले आहे. जागतिक पातळीवरील विविध घडामोडींमुळे हे संकलन कमी झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान मे 2026 मध्ये देशाचे जीएसटी संकलन रु. 1.94 लाख कोटी झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.