For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गृहलक्ष्मी : सप्टेंबर, ऑक्टोबरची रक्कम लवकरच

10:29 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
गृहलक्ष्मी   सप्टेंबर  ऑक्टोबरची रक्कम लवकरच
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आश्वासन

Advertisement

बेंगळूर : गृहलक्ष्मी योजनेची सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. शक्य तितक्या लवकर ही रक्कम मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. बेंगळूर येथे 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अक्का पथक, गृहलक्ष्मी बँक उद्घाटन, अंगणवाड्यांचा सुवर्णमहोत्सव या कार्यक्रमांची तुमकूर येथे पूर्वतयारी बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील गृहलक्ष्मी योजनेतील रक्कम शक्य तितक्या लवकर मंजूर करण्यात येईल. भाजपने आमच्या या योजनेची नक्कल करून सर्व ठिकाणी प्रचार चालविला आहे. महिला सक्षमीकरण हेच आमच्या खात्याचे ध्येय आहे. राज्यात जारी करण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजना समोर ठेवून त्यांची अनेक राज्येही अंमलबजावणी करत आहेत, असे त्या म्हणाल्या.

अंगणवाड्यांमध्ये एलकेजी, युकेजी

Advertisement

अंगणवाडी केंद्रांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, राज्यात 50 हजार अंगणवाडी केंद्रे स्वत:च्या इमारतीत कार्यरत आहेत. दरवर्षी 2 हजार इमारती निर्माण केल्या जात आहेत. अंगणवाडी केंद्रांमध्ये एलकेजी, युकेजी सुरू करण्यात येणार आहेत. पदवीधर 17 हजार अंगणवाडी कर्मचारी शिक्षिका म्हणून काम करत आहेत. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली जाईल, असेही त्या म्हणाल्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविणार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. येत्या काळात आणखी एक हजार रुपये वाढ करण्यात येईल. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यात आली आहे. त्यांनी राज्यातील जातनिहाय सर्वेक्षणात मदत केली आहे. त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे, असेही मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.