महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चौथ्या तिमाहीत विकास दर घसरणार : एनएसओचा दावा

06:45 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सलग तीन तिमाहीत 8 टक्के इतका दमदार वृद्धीदर राखल्यानंतर आर्थिक वर्ष 2024 च्या मार्चच्या चौथ्या तिमाहीत विकास दर कमी राहण्याची शक्यता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) यांच्याकडून  वर्तवली जात आहे. चार तिमाहीपेक्षा विकास दर नीचांकी स्तरावर राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

आर्थिक वर्ष 2024 मध्ये पहिल्या तीन तिमाहीत विकास दर अनुक्रमे 8.2, 8.1 व 8.4 टक्के इतका राहिला होता. मात्र आता मार्चअखेरच्या चौथ्या तिमाहीत विकास दरावर परिणाम जाणवू शकतो, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.

किती राहू शकतो जीडीपीदर

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मते आर्थिक वर्ष 2024 मधील चौथ्या तिमाहीत मात्र विकास दर 5.9 टक्क्यावर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. संपूर्ण आर्थिक वर्षाकरीता विकास दर 7.6 टक्के राहणार असल्याचाही अंदाज त्यांनी सांगितला आहे.

कारण काय

औद्योगिक क्षेत्राच्या विकासाची चाचपणी करताना ऊर्जेची मागणी व पोलादाचा खप या गोष्टी पाहिल्या जातात. यात घसरण झाली असल्याने चौथ्या तिमाहीत अपेक्षीत विकास दर साधला जाणार नाही, अशी शक्यता एनएसओ संस्थेने बांधली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article