For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आर्थिक वर्षात 6.6 टक्के विकास दर राहणार : डेलॉइट इंडियाचा अंदाज

06:17 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
आर्थिक वर्षात 6 6 टक्के विकास दर राहणार   डेलॉइट इंडियाचा अंदाज
Advertisement

मुंबई : 

Advertisement

डेलॉइट इंडिया यांनी आर्थिक वर्ष 2024-25 करीता भारताचा जीडीपी दर हा म्हणजेच विकास दर 6.6 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. निर्यातीत होणारी वाढ आणि भांडवलाचा वाढता प्रवाह ही दोन मुख्य कारणे त्यामागे असतील, असेही डेलॉइट इंडिया यांनी नमूद केले आहे.

अहवालात म्हटले आहे की, भारताची आर्थिक प्रगती योग्य देशेने कार्यरत असून मध्यम वर्गाच्या क्रय शक्तीत वाढ झाली आहे. प्रिमीयम लक्झरी उत्पादनांची   मागणी वाढली आहे. डेलॉइटने मागच्या आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी दर 7.6 ते 7.8 टक्के राहणार असल्याचे म्हटले होते. जानेवारीत कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जीडीपी दर 6.9 ते 7.2 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाजही वर्तवला होता. याअनुषंगाने डेलॉइटने नव्याने अंदाज मांडताना तिमाहीतील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा जीडीपी दर 6.6 टक्के इतका आणि त्यापुढच्या आर्थिक वर्षात तो 6.75 टक्के इतका राहू शकतो असा अंदाज मांडला आहे.

Advertisement

डेलॉइट इंडियाच्या अर्थतज्ञ रुमकी मजूमदार म्हणाल्या, जागतिक अर्थव्यवस्थेत 2025 मध्ये योग्य तो सकारात्मक बदल होणार असून निवडणुकीसंबंधीची अनिश्चितता दूर होणार आहे. केंद्रीय बँकेकडून 2024 मध्ये दरात कपातीची घोषणा होऊ शकते. भारतात भांडवल प्रवाहात सुधारणा होत असून सोबत निर्यातीत आगामी काळात वाढीला संधी आहे.

Advertisement
Tags :

.