For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इलेक्ट्रिक वाहनांकडे बेळगावकरांचा वाढता ओढा

06:14 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
इलेक्ट्रिक वाहनांकडे बेळगावकरांचा वाढता ओढा
Advertisement

इव्हीचा फोटो वापरणे

Advertisement

त. भा.प्रतिनिधी

बेळगाव : पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे वाहनचालकांचा ओढा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे. बेळगाव आरटीओ कार्यालयाच्या अंतर्गत केवळ जुलै महिन्यात 817 इलेक्ट्रिक वाहनांची नेंदणी झाली आहे. चालू वर्षात सर्वाधिक वाहन खरेदी ही जुलै महिन्यात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केवळ दुचाकीच नाही तर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल आहे.

Advertisement

बेळगाव आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या केए 22 या रजिस्ट्रेशन विभागांतर्गत जुलै 2026 मध्ये 3 हजार 574 वाहनांची नोंदणी झाली आहे. जून महिन्यात 3 हजार 640 वाहनांची नोंदणी झाली होती. जून महिन्याच्या तुलनेत वाहनांची नोंदणी कमी झाली असली तरी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मात्र वाढली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत बेळगाव आरटीओ कार्यालयात 27 हजार 527 वाहनांची नोंदणी झाली आहे.

जानेवारीमध्ये 3 हजार 831, फेब्रुवारी 3 हजार 356, मार्च 5 हजार 510, एप्रिल 4 हजार 082, मे 3 हजार 532, जून 3 हजार 640 तर जुलै महिन्यात 3 हजार 574 वाहनांची नोंदणी झाली आहे. यापैकी 2 हजार 706 मोटारसायकल व स्कूटर आहेत. पेट्रोलवर चालणारी 1300 वाहने असून उर्वरित 817 ही इलेक्ट्रिक वाहने आहेत.

सध्या पावसाळ्याचा कालावधी असल्याने वाहनखरेदी कमी असते. तरीदेखील बेळगावमध्ये सरासरी वाहनांची खरेदी सुरू आहे. दसऱ्यापासून वाहनविक्रीला पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.