For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हवामान संकटाच्या चिंतेवरून युवांमध्ये वाढता आक्रोश

06:50 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
हवामान संकटाच्या चिंतेवरून युवांमध्ये वाढता आक्रोश
Advertisement

94 टक्के भविष्यावरून चिंतेत

Advertisement

हवामान बदल आता केवळ पर्यावरणीय आव्हान राहिलेले नाही, तर हे युवांच्या मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पाडणारी जागतिक समस्या ठरले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (युएनईपी)चा नवा अहवाल आणि भारतात करण्यात आलेल्या जनमत सर्वेक्षणातून ईको एंक्झाइटी म्हणजेच हवामानाशी निगडित चिंता 21 व्या शतकातील पहिल्या पिढीदरम्यान वेगाने फैलावत असल्याचे समोर आले आहे. दु:ख, निराशा, असहाय्यता आणि संताप यासारख्या भावना युवांमध्ये सामान्य ठरत आहेत, तर 94 टक्के युवांनी हवामान बदलामुळे स्वत:च्या भविष्यावरून गंभीर चिंतेत आहोत असे मानले आहे.

युएनईपीने स्वत:चा अहवाल ‘नेविगेटिंग न्यू होराइजंस : ए ग्लोबल फोरसाइट रिपोर्ट ऑन प्लेनेटरी हेल्थ अँड ह्यूमन वेलबीइंग’मध्ये जगभरात युवांदरम्यान ईको एंक्झाइटी एक उभरते संकट ठरल्याचा इशारा दिला आहे. याला क्लायमेट ग्रीफ किंवा हवामानाशी निगडित दु:खही म्हटले जाते, जे पर्यावरणीय हानी आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांची प्रतिक्रिया आहे. डाउन टू अर्थने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 दरम्यान 16-25 वयोगटातील 300 हून अधिक युवांदरम्यान जनमत सर्वेक्षण केले आहे.

Advertisement

या सर्वेक्षणात सामील 88 टक्के लोकांनी आसपासच्या हवामानातील बदल जाणवत असल्याचे सांगितले आहे. तर 67 टक्के लोकांनी हा बदल स्वत:च्या दैनंदिन जीवन आणि जीवनशैलीला प्रभावित करत असल्याचे मान्य केले आहे. मागील 25 वर्षांमध्ये जन्मलेल्या पिढीने बहुधा कधीच सामान्य हवामानाचा अनुभवच घेतला नसल्याचे संकेत हे अध्ययन देते. उष्णतेची लाट, चक्रीवादळ आणि पूर यासारख्या टोकाच्या घटना आता सामान्य ठरत आहेत आणि युवा त्यांना पूर्वीपेक्ष अधिक तीव्रतेने अनुभवत आहेत.

अन्नगुणवत्तेतील बदलाची भीती

कुठल्या संकेतांना हवामान बदलाशी जोडता असा प्रश्न सर्वेक्षणात युवांना विचारण्यात आला. यावर दोन-तृतीयांशापेक्षा अधिक लोकांनी वाढते तापमान आणि अवेळी उष्णता किंवा पावसालाचा याचा प्रमुख संकेत मानले आहे. जवळपास 40 टक्के लोकांनी धूके किंवा धूरक्याने युक्त दिवसांना तर 36 टक्के लोकांनी अन्न गुणवत्तेत बदलाला तर 32 टक्के लोकांनी किटकांच्या वाढत्या संख्येला हवामान बदलाशी जोडले आहे. 38 टक्के लोकांनी अत्याधिक  थंडीलाही याचे एक लक्षण ठरविले आहे.

प्रभाव सर्वांवर, पण गरिबांवर सर्वाधिक

हवामान बदलाचा प्रभाव वेगवेगळ्या आर्थिक वर्गांवर वेगवेगळ्या प्रकारे पडतो का असा प्रश्न युवांना विचारण्यात आला. तर 61 टक्के युवांनी हे श्रीमंत, गरीब आणि मध्यमवर्गाला समान स्वरुपात प्रभावित कर असल्याचे सांगितले. लैंगिक आधारावर मत जवळपास सर्वांचे एकसारखे राहिले. सुमारे 90 टक्के युवांचे हवामान बदल पुरुष आणि महिला दोन्हींना समान स्वरुपात प्रभावितक रत असल्याचे मानणे आहे.

चिंता, असहाय्यपणा अन् भीती

हवामान बदलाचा भावनात्मक प्रभाव सर्वेक्षणात स्पष्टपणे झळकतो. यात सामील लोकांना स्वत:च्या भावना निवडण्यासाठी 6 पर्याय देण्यात आले, भीतीयुक्त अन् उदास, चिंतित, संताप, असहाय्य, फसवले गेल्याची आणि उदासीन असे पर्याय होते. 57 टक्के युवांनी स्वत:ला चिंतेत, 54 टक्के युवांनी असहाय्य आणि 43 टक्के युवांनी भीतीयुक्त अन् उदास वाटत असल्याचे सांगितले. अनेक युवांनी संताप आणि फसविले गेल्याचीही भावना व्यक्त केली. भविष्यावरून शंकाही तीव्र आहेत. सुमारे 53 टक्के युवांना हवामान बदलामुळे आजार वाढतील अशी भीती आहे. तर एक तृतीयांशापेक्षा अधिक जणांनी अन्नसंकटाची भीती व्यक्त केली आणि 45 टक्के जणांनी जलसंकटावरून चिंता दर्शविली आहे. एकूण 94 टक्के युवांनी हवामा बदल आमच्या भविष्यावरून आम्हाला त्रस्त करत असल्याचे म्हटले आहे. तर निम्म्या युवांनी सरकारच्या कारवाईला निराशाजनक ठरविले आहे.

युवांची चिंता पूर्णपणे वैध

युवांची ही प्रतिक्रिया अस्वाभाविक नसल्याचे तज्ञ मानतात. क्लायमेट एंक्झाइटीवर मोठ्या आंतरराष्ट्रीय अध्ययनाच्या सहलेखिका आणि युनिव्हर्सिटी ऑफ बाथशी निगडित कॅरोलिन हिकमॅन यांनी आमच्या मुलांची चिंता पूर्णपणे वैध असल्याचे म्हटले आहे. मुले आणि युवा आता जगभरात संघटित होत आहेत आणि सरकारांना न्यायालयात  आव्हान देत आहेत. हवामान बदल संकटावर पावले न उचलणे मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचा युक्तिवाद युवांकडून केला जात आहे.

Advertisement
Tags :

.