उत्तराखंडमध्ये आढळले आकार वाढणारे ग्लेशियर
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्याच्या धौलीगंगा खोऱ्यात दाने ग्लेशियर्सदरम्यान एक नवे ग्लेशियर आढळून आले आहे. हे ग्लेशियर सातत्याने वाढत आहे. भारत आणि तिबेटच्या सीमेनजीक म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक हे ग्लेशियर आहे. या ग्लेशियरचा आकार 48 चौरस किलोमीटर इतका आहे. हा नवा ग्लेशियर नीति व्हॅलीत असलेल्या रांडोल्फ आणि रेकाना ग्लेशियरनजीक आहे.
हा निनावी ग्लेशियर 7354 मीटर उंच आता गामी आणि 6535 मीटर उंच गणेश पर्वतादरम्यान 10 किलोमीटर लांबवर फैलावलेला आहे. याचे अध्ययन ग्लेशियोलॉजिस्ट आणि हिमालयीन तज्ञ डॉ. मनीष मेहता, विनीत कुमार, अजय राणा आणि गौतम रावत यांनी केले आहे. हा ग्लेशियर अत्यंत वेगाने फैलावल्याचे आणि वाढल्याचे त्यांच्या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे.
या चारही जणांच्या अध्ययनाचे नाव मॅनिफेस्टेशन्स ऑफ अ ग्लेशियर सर्ज इन सेंट्रल हिमालय युजिंग मल्टी-टेम्पोरल सॅटेलाइट डाटा आहे. यात ग्लेशियरच्या सर्जचा उल्लेख आहे, ग्लेशियर सर्ज म्हणजे त्याचा आकार वाढणे.
तीन घटक कारणीभूत
हे ग्लेशियर ज्याठिकाणी आहे तेथे जाणे शक्य नाही. अध्ययन उपग्रहीय डाटाच्या आधारावर करण्यात आले आहे. ग्लेशियर वाढण्यामागे तीन कारणे असू कशतात. पहिले हायड्रोलॉजिकल इम्बॅलेंसिंग म्हणजेच पाण्याच्या पोरोसिटीद्वारे बर्फाचे आच्छादन तयार होते. यात बर्फाच्या आच्छादनाची स्थिरता कमी होते, यामुळे हे खालून सरकू लागते. दुसरे कारण थर्मल कन्स्ट्रॉस्ट म्हणजेच ग्लेशियरखालचा पृष्ठभाग निसरडा होतो, म्हणजेच वरील अणि खालील थरादरम्यान घर्षण वाढते, तिसरे कारण सेडीमेंट्री टरेमध्ये पाण्यात चिकटपणा तयार होते, यामुळे वरील थर खालच्या दिशेने घसरू लागतो. जर ग्लेशियोलॉजिकल अध्ययन घटनास्थळी करण्याची संधी मिळाली तर अधिक प्रभावी डाटासोबत चांगले निष्कर्ष प्राप्त करता येऊ शकतात असे डॉ. मेहता यांनी म्हटले आहे.