एफएमसीजीत वरुण बेव्हरेजेसच्या वर्चस्वात वाढ
कंपनी भारतासह विदेशातही विस्तार करण्याच्या तयारीत : 60 टक्के परतावा देत मजबूत कामगिरीवर भर
नवी दिल्ली :
वरुण बेव्हरेजेसने गेल्या वर्षभरात एफएमसीजी क्षेत्रात 60 टक्के परतावा देऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. प्रतिस्पर्धी निर्देशांक निफ्टी एफएमसीजीच्या तिप्पट वाढीव कामगिरी कंपनीची राहिली आहे. वर्ष 2023 च्या शेवटच्या नऊ महिन्यांत 22 टक्के विक्री नोंदवलेली कंपनी मजबूत वितरण, नवीन ऑफर्स आणि आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या मदतीने आपली स्थिती आणखी मजबूत बनवू शकणार असल्याचा ब्रोकर्सचा विश्वास आहे.
वार्षिक 15.4 टक्के विक्री वाढीमुळे कंपनीच्या महसूल वाढीला मदत झाली. कंपनीची विक्री 22 कोटीपर्यंत वाढली. विक्री वाढ भारतीय (14.8 टक्के) आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर (17.5 टक्के) केंद्रित असताना, प्राप्ती आंतरराष्ट्रीय बाजारांद्वारे मिळवण्यात आली. कंपनीची दोन अंकी वाढ तिच्या एफएमसीजी प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगली आहे. ग्रामीण भागातील प्रवेश आणि मजबूत बाजार धोरण यामुळे याला मदत झाली. कंपनी 1.25 कोटी रिटेल आउटलेटपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली आहे, तर सध्या ही संख्या सुमारे 35 लाख आहे.
कोर कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स व्यतिरिक्त, कंपनी सर्व आउटलेटवर उच्च मार्जिन असलेल्या स्टिंग एनर्जी ड्रिंक्सची पोहोच वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. नॉन-कार्बोनेटेड सेगमेंटमध्ये, कंपनी डेअरी (मँगो शेक आणि कोल्ड कॉफीसह), स्पोर्ट्स ड्रिंक्स (गेटोरेड) आणि ज्यूस (ट्रॉपिकाना, स्लाइस, निंबूज) मध्ये आपले योगदान वाढवत आहे.
एमके रिसर्चचे देवांशू बन्सल आणि विशाल पंजवानी यांचा विश्वास आहे की कंपनी नवीन उत्पादनांमधून (ऊर्जा/क्रीडा/दुग्ध) किफायतशीर किमतीत वाढ मिळवण्याची शक्यता आहे. यामुळे 2022-25 वर्षात ऑपरेटिंग आणि निव्वळ नफ्यात 25-30 टक्के वाढ होऊ शकते.
व्याप्ती वाढविण्याच्या तयारीत कंपनी
वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, कंपनी आपली उत्पादनाची व्याप्ती वाढवत आहे आणि वर्ष 2023 च्या 9 महिन्यांत राजस्थानमधील बुंदी आणि मध्य प्रदेशातील जबलपूर येथे नवीन युनिट्स स्थापन करण्यासाठी सुमारे 2,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. कंपनीने भारतात आणि परदेशातही विस्तार करण्याची योजना आखली आहे. वरुण बेव्हरेजेसने वर्ष 2024 मध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा येथे तीन नवीन प्रकल्प स्थापन करण्याची योजना आखली आहे.