For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रो स्पोर्ट्स फुटबॉल चॅम्पियन

09:54 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
ग्रो स्पोर्ट्स फुटबॉल चॅम्पियन
Advertisement

अखिलेश अष्टेकर गोल्डन बुटचा मानकरी

Advertisement

बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब चषक निमंत्रितांच्या आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात नंतर गुणाच्या अधारे ग्रो स्पोर्ट्स संघाने 18 गुणासह विजेतेपद भारत एफसीने 17 गुणासह उपविजेत्या पदावरती समाधान मानावे लागले. अखिलेश अष्टेकरला गोल्डन बुट पुरस्काराने गौरवण्यात आले. वडगाव येथील सीआर-7 टर्फ फुटबॉल मैदानावरती घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात ओल्ड फॅट्स एफसीने के. आर. शेट्टी किंग्स संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 16 मि.नी ला प्रद्युम्न बोकडेच्या पासवर शशांक बोळगुंडीने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 33 व्या मि. टाला शशांकच्या पासवर प्रद्युम्न बोकडेने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात ग्रो स्पोर्ट्स संघाने टेन टेन एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात दुसऱ्या सत्रात 37 व्या मि. ला कौशीक पाटीलच्या पासवर तेजस पाटीलने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्सने डिसायर्डस एफसीचा 6-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात साईराजच्या प्रज्वल लाडच्या पासवर अखिलेश अष्टेकरने 19 व्या मि.ला पहिला गोल केला. 22 व्या मि.नी.ला साहिल मांगणेच्या पासवर प्रज्वल लाडने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 23 व्या मि.नी.ला डिसायर्डसच्या मयुर पालेकरच्या पासवर कृष्णा आर ने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. 28 व्या मि.नीला डिसायर्डसच्या मयुर पालेकरने डी बाहेरून मारलेल्या वेगवान फटक्यावर सुंदर गोल करून 2-2 अशी बरोबरी साधली.

दुसऱ्या सत्रात 35 व 38 व्या मि.नी. ला अखिलेश अष्टेकरने गोल करून 4-2 अशी आघाडी मिळवून दिली. 41 मि.ना.ला महम्मद अनस चाँद याने पाचवा तर 46 मि.नी. ला साहील मांगलेने 6 वा गोल करून 6-2 अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात राहुल के. आर. शेट्टी संघाने ओल्ड फॅट संघाचा 2-0 असा पराभव केला. 13 व्या मि.नि.ला राहुल के. आर. शेट्टीच्या मिथिल मंडोळकरच्या पासवर नजीब इनामदारने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 38 व्या मि. नी. ला नजीबच्या पासवर मिथिल मंडोळकरने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. शेवटच्या साखळी सामन्यात भारत एफसीने ग्रो स्पोर्ट्सचा 2-1 असा निसटता पराभव केला. सामन्यात 11 व्या मिनिटाला भारत एफसीच्या तेजस पाटीलच्या पासवर सौरभ धामणेकरने पहिला गोल केला. 21 व्या मि.नी.ला ग्रो स्पोर्ट्सच्या तेजसच्या पासवर राहिल मुगटखानने बरोबरीचा गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 42 व्या मिनिटाला सौरभ धामणेकरच्या पासवर तेजस पाटीलने निर्णायक गोल करून 2-1 ची आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर बक्षिस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोहित फगरे, राहुल पोटे, अभिलाश कसोटी, प्रशांत मुन्नोळी, प्रदिप मुन्नोळी, सलीम फनीबंद,अमोग निलजी, महांतेश जेम्स, सुमोध तिवारी व विजय रेडेकर यांच्या हस्ते स्पर्धेतील चॅम्पियन्स ठरलेल्या ग्रो स्पोर्ट्स संघाला आकर्षक चषक व 25 हजार रूपये रोख व सर्व खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे  

स्पर्धेतील उत्कृष्ट अझीज राऊत (राहुल के. आर. शेट्टी), उत्कृष्ट प्रोफेशनल टीम (ओल्ड फॅटस एफसी), उत्कृष्ट शिस्तबध्द संघ (भारत एफसी), स्पर्धेतील उदयन्मुख खेळाडू म्हणून ओंमकार जळगेकर (ओल्ड फॅटस), उत्कृष्ट डिफेंडर अमृत मण्णूकर (भारत), उत्कृष्ट मिडफिल्डर राहिद मुगटकर (ग्रोएफसी), उत्कृष्ट फॉरवर्ड धनंजर सुळगेकर (ग्रोएफसी), गोल्डन गुट पुरस्कार अखिलेश अष्टेकर (साईराज वॉरियर्स) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून योहान कोठारी हुबळी यांनी काम पाहिले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय रेडेकर, अमरदिप पाटील, निलेश साळुंखे, ओंमकार हुंडेकर, साहील मांगले, शुभम यादव, विवेक सनदी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.