कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने संघटन वाढवूया
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
शासकीय विश्रामगृह येथे प्रमुख पदाधिक्रायांची बैठक
कोल्हापूर
भारतीय जनता पार्टी संघटनेच्या आधारावर चालणारी पार्टी असून विशद कार्यकर्त्या लोकप्रतिनिधी यांच्या समन्वय आणि संघटन वाढवूया असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे मंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या प्रमुख पदाधिक्रायांची बैठक झाली या प्रसंगी ते बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार हे पूर्ण बहुमतात स्थापन झालेले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला गतिमान पद्धतीने काम करायचे आहे. कोल्हापूर जिह्यातील ही विकासाची गंगा अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी महायुतीच्या दहाच्या दहा आमदाराच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. अशा काळात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक रचना सुद्धा आपल्याला बलवान करायच्या असून त्यासाठी येत्या 19 फेब्रुवारी पर्यंत होण्राया सभासद नोंदणी अभियानामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
ते पुढे म्हणाले, संघटनात्मक कामात रचनात्मक काम करण्राया कार्यकर्त्याला निश्चितपणे पक्षात आणि सरकारात चांगली जबाबदारी दिली जाईल. नजीकच्या काळात विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करावे लागेल. तसेच आगामी होण्राया समिती रचना यामध्ये सुद्धा पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका स्वीकारली जाईल त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठीच पुढील काळात काम केले जाईल असे सांगितले.
बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, विजय जाधव, राजवर्धन नाईक निंबाळकर, अरुण इंगवले, राहुल चिकोडे, अल्केश कांदळकर, शिवाजी बुवा, आनंद गुरव, सुशीला पाटील, डॉ .स्वाती पाटील, गायत्री राऊत पाटील सर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.