लवकरच ग्रोव्हचा येणार आयपीओ
07:00 AM Jun 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : ऑनलाइन इन्वेस्टमेंट कंपनी ग्रोव्हचा आयपीओ लवकरच भारतीय शेअरबाजारात सादर केला जाणार आहे. या आयपीओद्वारे कंपनी 700 दशलक्ष डॉलर्स ते 1 अब्ज डॉलर्सची रक्कम उभारणार असल्याचे समजते. यासंदर्भातला रितसर अर्ज कागदपत्रांसह शेअरबाजारातील नियामक सेबीकडे सुपूर्द केला आहे. हा कंपनीचा आयपीओ सर्वाधिक मूल्याचा, आकाराचा असणार आहे. स्विगी, पेटीएम आणि झोमॅटो या नव्या दमाच्या कंपन्यांप्रमाणेच ग्रोव्हचा आयपीओ असेल.
Advertisement
Advertisement