For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेर्लेतील लघु धरण सह्याद्री पट्ट्याला वरदान ठरणार

05:43 PM Jan 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वेर्लेतील लघु धरण सह्याद्री पट्ट्याला वरदान ठरणार
Advertisement

आ . दीपक केसरकर यांचे प्रतिपादन ; वेर्ले येथील लघु धरण प्रकल्पाचे भूमिपूजन

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

वेर्ले गावातील हे लघु धरण पर्यटन विकासाच्या दृष्टीने सह्याद्री पट्ट्याला वरदान ठरणार आहे. शिरशिंगे. येथील मध्यम धरण प्रकल्प आणि वेर्ले या दोन्ही धरणांमुळे सह्याद्री पट्ट्याच्या दशक्रोशीतील गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. उडेली धरण हे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करण्यास सुलभ होईल. सावंतवाडी तालुक्यात नव्याने होणारे तीन धरण प्रकल्प एक नवी संजीवनी देणारे आहेत असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले येथील 90 कोटी रुपये खर्चाच्या लघु धरण प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन श्री केसरकर यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी ते बोलत होते . यावेळी उपविभागीय अधिकारी श्री धोत्रे,सौरभ आहिरे , सचिन वालावलकर, सरपंच सुचिता राऊळ ,उपसरपंच मोहन राऊळ ,बाबा उर्फ यशवंत राऊळ,गोविंद लिंगवत.,रवींद्र मडगावकर ,पंढरी पुनाजी राऊळ. माजी जि प सदस्य पंढरी राऊळ, जीवन लाड ,राजन रेडकर ,जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, श्री हरमलकर ,ठेकेदार प्रकाश पाटीलआदी उपस्थित होते. सह्याद्री पट्ट्यातील वेर्ले धरणाच्या कामाचे भूमिपूजन आज थाटात करण्यात आले. श्री केसरकर यांनी यावेळी येत्या दोन ते तीन वर्षात हे धरण पूर्ण होणार असून या धरणापासून या भागाला मुबलक पाणी पुरवठा होईल असे स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.