For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संदीप गावडेंच्या हस्ते चौकुळ येथील रस्ता कामाचे भूमिपूजन

03:51 PM Jun 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
संदीप गावडेंच्या हस्ते चौकुळ येथील रस्ता कामाचे भूमिपूजन
Advertisement

वार्ताहर/ आंबोली

Advertisement

चौकुळ म्हाराठी बेरडकीवाडी येथे बहुप्रतिक्षित रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. यामुळे येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून येथील ग्रामस्थांची दळणवळणाची सोय मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे.यावेळी भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, बूथ अध्यक्ष संतोष गावडे, बूथ अध्यक्ष सोमा गावडे, चौकुळ विकास सोसायटीचे चेअरमन पी. डी. गावडे, दयानंद गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आणि अनिकेत आसोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना संदीप गावडे यांनी, "या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून, विकासाला गती मिळेल," असे सांगितले. तसेच, या रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यामुळे परिसरातील शेतीमाल वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याची सोय अधिक सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (फोटो- विजय राऊत)

Advertisement
Advertisement
Tags :

.